भोर (जिल्हा पुणे) : सध्या भारतातील बहुतांश मुसलमान ‘हलाल’ची मागणी करत आहेत. ही मागणी केवळ मांसापुरती मर्यादित राहिली नसून धान्य, फळे, सौंदर्यप्रसाधने, औषधे आदी उत्पादनेही हलाल नामांकित असावीत, अशी मागणी मुसलमान करत आहेत. त्यासाठी व्यापार्यांना प्रत्येक उत्पादनासाठी २१ सहस्र ५०० रुपये भरून ‘हलाल’ प्रमाणपत्र घ्यावे लागते. हे प्रमाणपत्र अन्न आणि औषध प्रशासनाकडून नव्हे, तर ‘जमियत-उलेमा-ए-हिंद’ या खासगी मुसलमान संघटनेकडून दिले जाते. हिंदूंचा व्यापार आणि व्यवसाय यांमध्ये हस्तक्षेप करून समांतर आर्थिक व्यवस्था उभी करण्याचे हे जागतिक षड्यंत्र आहे. हलालरूपी आर्थिक जिहादला सर्व हिंदूंनी संघटितपणे विरोध केला पाहिजे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. २३ फेब्रुवारी या दिवशी बालाजी मंदिरामध्ये पंचक्रोशीतील व्यावसायिकांसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कापड, किराणा दुकानदार, सोने-चांदीचे व्यापारी, खाटिक समाज, तसेच हिंदुत्वनिष्ठ असे ६० हून अधिक जण उपस्थित होते.
वैशिष्ट्यपूर्ण
- व्याख्यानानंतर अनेकांनी शासनापर्यंत हा विषय पोचवण्यासाठी प्रशासनाला निवेदन देण्याचे ठरवले. ‘गैरमुसलमान व्यक्तींकडून महिलांनी बांगड्या भरणे आणि हिंदु व्यावसायिकांकडूनच वस्तू खरेदी करणे’, ही सूत्रेही सामूहिक स्तरावर निश्चित करण्यात आली.
- भोसरी येथे २२ फेब्रुवारीला असे व्याख्यान आयोजित करून व्यावसायिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.