धर्मांधांकडून होत असलेल्या हिंसाचाराचा परिणाम !
- देहलीतील हिंसाचारावरून राष्ट्रपतींना निवेदन देणारी काँग्रेस अलीगड येथील हिंदूंविषयी तोंड का उघडत नाही ?
- ‘देश, राज्य, शहर, गाव आदी ठिकाणी जेथे हिंदू अल्पसंख्यांक असतात, तेथे त्यांना पलायनच करावे लागते’, हा इतिहास आणि वर्तमान आहे. याकडे पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात, हे लक्षात घ्या !
- हिंदु वस्तींत अल्पसंख्य समाजातील एखाद्याला घर नाकारल्यावर आकांडतांडव करणारे पुरो(अधो)गामी धर्मांध अधिक संख्येने असलेल्या भागांतील हिंदूंच्या या दुःस्थितीविषयी मौन का बाळगतात ?
अलीगड (उत्तरप्रदेश) – येथे २३ फेब्रुवारी या दिवशी धर्मांधांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात हिंसाचार केला होता. धर्मांधांनी दगडफेक, गोळीबार आणि जाळपोळ केली होती. यामुळे येथील हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिणामी येथील बाबरी मंडी भागातील हिंदूंनी आता त्यांची घरे विकून दुसरीकडे जाण्याची सिद्धता केली आहे. अनेक हिंदूंनी त्यांच्या घरांवर ‘हे घर विकणे आहे’ असे फलक लावले आहेत.
१. हिंदूंचे म्हणणे आहे की, अशा प्रकारचा हिंसाचार प्रथमच झालेला नाही. गेल्या अनेक वर्षांपासून धर्मांधांकडून अशी कृत्ये केली गेली आहेत. त्यामुळे येथील हिंदूंमध्ये कायम दहशत असते. हिंदूंमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून ते येथून दुसरीकडे जाऊ इच्छित आहेत. अनेक हिंदूंनी तर घरे बंद करून दुसर्या ठिकाणी स्थलांतरही केले आहे.
२. येथील पोलीस अधीक्षक मुनीराज म्हणाले की, बाबरी मंडी भागातील स्थानिक लोकांची भेट घेऊन मोहल्ला समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यात लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही केला. हिंदूंना भेटून त्यांनाही विश्वास ठेवण्यास सांगण्यात आले आहे.