Menu Close

भगवान परशुराम यांच्या अवमानाच्या विरोधात कृती करणार्‍या धर्माभिमानी पत्रकारांचे अभिनंदन !

धार्मिक भावना दुखावल्याने केली तक्रार ! – गौरांग प्रभु मळकर्णेकर, पत्रकार

श्री . गौरांग प्रभु मळकर्णेकर

हिंदुद्वेष्टे रामकृष्ण जल्मी याच्या विरोधात गोव्यात १ मार्च या दिवशी अनेक तक्रारी पोलीस ठाण्यात प्रविष्ट झाल्या आहेत. या तक्रारदारांमध्ये पत्रकार गौरांग प्रभु मळकर्णेकर यांचाही समावेश आहे. गौरांग प्रभु मळकर्णेकर यांनी कोलवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. या तक्रारीविषयी अधिक माहिती देतांना गौरांग प्रभु मळकर्णेकर म्हणाले, ‘‘धार्मिक भावना दुखावण्याचा अधिकार कोणालाही नाही. धार्मिक भावना दुखावणे म्हणजे आमच्या आईवडिलांना अपकीर्त करण्यासारखे आहे. धार्मिक भावना दुखावून लोकांना प्रक्षुब्ध करण्याच्या प्रकार बंद झाला पाहिजे.’’

‘देवतांचा अनादराच्या विरोधात हिंदु जनजागृती समिती कृती करेल’, याविषयी लोकांचा विश्‍वास वाढत आहे !

बाणावली येथे २९ फेब्रुवारीला सीएएच्या विरोधातील सभेत हिंदुद्वेष्टे रामकृष्ण जल्मी यांनी भगवान परशुराम यांच्याविषयी अवमानकारक आणि अत्यंत हीन वक्तव्य केल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या एका हिंदुत्वनिष्ठ पत्रकाराने हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्याला संपर्क साधला. हिंदुत्वनिष्ठ पत्रकाराने सभेत हिंदुद्वेष्टे रामकृष्ण जल्मी याने केलेल्या वक्तव्याचे ध्वनीचित्रीकरण पाठवून रामकृष्ण जल्मी यांच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे, असे मत हिंदु जनजागृती समितीकडे व्यक्त केले. पत्रकार हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्याला म्हणाला, ‘‘माझ्यासाठी धर्मापेक्षा मोठे काहीही नाही. रामकृष्ण जल्मी या नीच व्यक्तीवर योग्य कारवाई झाली पाहिजे.’’ यानंतर १ मार्च या दिवशी गोव्यात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि हिंदुत्वनिष्ठ पत्रकार यांनी हिंदुद्वेष्टे रामकृष्ण जल्मी यांच्या विरोधात तक्रार केल्यानंतर रामकृष्ण जल्मी यांच्यावर पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई केली. या कारवाईनंतर या हिंदुत्वनिष्ठ पत्रकाराने हिंदु जनजागृती समितीला पुढील संदेश पाठवला. ‘धर्मासाठी अशीच एकजूट दाखवूया. धर्मो रक्षति रक्षित: !’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *