भिवंडी : येथील भंडारी कंपाऊंड भागात असलेल्या ७२ गाळा परिसरातील एका कपड्याच्या कारखान्याच्या भिंतीवर कोणी थुंकू नये अथवा लघुशंका करू नये यांसाठी कारखान्याच्या मालकाने हिंदु देवतांची चित्रे असलेल्या ‘टाईल्स’ लावल्या होत्या. तरीही तेथे थुंकणे, लघुशंका करणे असे प्रकार होत होते. त्यामुळे श्रद्धास्थानांचा हा अवमान थांबावा या दृष्टीने हिंदुत्वनिष्ठांनी येथील देवतांची चित्रे असलेल्या ‘टाईल्स’ काढून देवतांची विटंबना रोखली.
याविषयी मालकाला धर्मरक्षक संघटनेचे अध्यक्ष सर्वश्री राकेश राणा, प्रभाकर बेथी, अशोक म्याना, आनंद सिंग आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ यांनी ‘हिंदु देवतांची विटंबना होत आहे. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावत आहेत’, असे सांगितले होते; मात्र ३ वेळा सांगूनही ‘टाईल्स’ न काढल्याने हिंदुत्वनिष्ठांनी स्वतःच त्या काढल्या. या संदर्भात पोलिसांनीही कारखान्याच्या मालावर कारवाई केल्याचे समजते.
वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात