Menu Close

आसाम येथील पू. वृद्ध प्रभु यांना हिंदु जनजागृती समितीकडून नवम् अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे निमंत्रण

पू. वृद्ध प्रभु यांना समितीच्या कार्याविषयी सांगतांना पू. नीलेश सिंगबाळ

होजाई (आसाम) : येथील सिलीगुडी विभागामधील वृद्ध प्रभु आश्रमाचे संस्थापक पू. वृद्ध प्रभु यांनी हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ आणि समन्वयक श्री. शंभू गवारे यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यासाठी आशीर्वाद घेतले. तसेच त्यांना गोव्यामध्ये होणार्‍या नवम् अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाविषयी माहिती देऊन त्याचे निमंत्रण दिले.

१. पू. सिंगबाळ यांनी पू. वृद्ध प्रभु यांना समितीकडून करण्यात येणार्‍या राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या कार्याची माहिती दिली. त्यावर वृद्ध प्रभु म्हणाले, ‘‘तुम्ही पुष्कळच महान कार्य करत आहात. आम्ही तुमच्या समवेत आहोत. नोव्हेंबरमध्ये आम्ही एक मोठा कार्यक्रम आयोजित करणार आहोत. तेथे येऊन तुम्ही तुमच्या कार्याविषयी सांगावे.’’ तसेच पू. वृद्ध प्रभु यांनी त्यांच्या आश्रमातील सर्व भक्तांना बोलावून त्यांना पुन्हा समितीच्या कार्याविषयी सांगण्यास सांगितले.

२. होजाई येथील धर्मप्रेमी श्री. बिस्व ज्योति नाथ यांनी पू. वृद्ध प्रभु यांची भेट घेण्याचे नियोजन केले होते. ते म्हणाले की, पू. वृद्ध प्रभु कितीही मोठी किंवा प्रतिष्ठित व्यक्ती त्यांना भेटण्यास आली, तरी ते ५ मिनिटांपेक्षा अधिक वेळ त्यांना देत नाहीत. तुम्हाला त्यांनी पुष्कळ वेळ दिल्याने माझी भावजागृती होत होती.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *