Menu Close

अफझलखानाचे थडगे प्रशस्त; मात्र जन्मभूमीवरच प्रभु श्रीराम तंबूत बंदिस्त : मिलिंद धर्माधिकारी

पुणे येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

श्रीरामनवमीला रामजन्मभूमीवर पूजा करण्यास हिंदूंना विशेष अनुमती देण्याची रामभक्तांची मागणी

pune_rha1

पुणे : परकीय आक्रमकांनी जाणीवपूर्वक भारतातील हिंदूंची श्रद्धास्थाने उद्ध्वस्त केली. अनेक ठिकाणे मंदिरे जमीनदोस्त करून त्या ठिकाणी मशिदींची उभारणी केली. अयोध्येतही श्रीराम मंदिराच्या ठिकाणी बाबरीचा ढाचा बांधण्यात आला. पुढे शेकडो करसेवकांनी स्वतःचे रक्त सांडून तो ढाचा पाडला. या संदर्भात उच्च न्यायालयानेही निकाल देतांना ती भूमी रामलल्लाची आहे, असे स्पष्ट केले. असे असूनही अद्याप तेथील मुख्य स्थानावर श्रीरामनवमीला पूजा, तसेच उत्सव साजरा करण्यास हिंदूंना कोणतीही अनुमती नाही. एकीकडे प्रतापगडाच्या पायथ्याशी असणार्‍या अफझलखानाच्या कबरीचे उदात्तीकरण केले जाते, तर दुसरीकडे कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेले प्रभु श्रीराम त्यांच्याच जन्मभूमीत तंबूत बंदिस्त आहेत. त्यामुळे येत्या १५ एप्रिलला म्हणजेच श्रीराम नवमीच्या दिवशी अयोध्येमध्ये समस्त हिंदु बांधवांना श्रीरामाचे पूजन करण्याची विशेष अनुमती देण्यात यावी. आक्रमकांचे उदात्तीकरण आणि देवतेची अवहेलना हिंदू सहन करणार नाहीत, अशी चेतावणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. मिलिंद धर्माधिकारी यांनी दिली. हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने १० एप्रिल या दिवशी कोथरूड येथील छत्रपती शिवाजी पुतळा चौकात आंदोलन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी सनातन संस्थेचे श्री. चंद्रशेखर तांदळे यांनीही उपस्थितांना संबोधित केले.

pune_rha4

येवलेवाडी येथील होय हिंदूच संघटनेचे श्री. स्वप्नील धांडेकर, सुतारवाडी येथील शिवसेनेचे प्रभागप्रमुख श्री. अक्षय भेगडे, शाखाप्रमुख श्री. ऋषिकेश कुलकर्णी, बावधन प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. निखिल (दादा) वेडे पाटील, धर्मरक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री. ऋषिकेश पवार यांसह १४० हून धर्माभिमानी या आंदोलनात सहभागी झाले होते. भव्य श्रीराममंदिर बनेपर्यंत रामजन्मभूमीवर नित्य पूजेसाठी छोटे राममंदिर बांधा, त्या ठिकाणी प्रसाद, तसेच पूजासामग्री घेऊन जाण्यासाठी असणारे निर्बंध हटवा, व्यर्थ न जावो रामसेवकांचे अतुल्य बलिदान अशी प्रबोधनात्मक माहिती असलेले फलक कार्यकर्त्यांनी हातात धरले होते.

pune_rha5

महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने आजही गोवंश मोठ्या प्रमाणावर कत्तलीसाठी नेला जात असून गोमांसाची तस्करी होत आहे. विद्यमान कायद्यात शिक्षेसाठी कठोर तरतुदी नसल्याने बहुतांश ठिकाणी अटक केलेल्या आरोपींना एका दिवसात जामिनावर मुक्त केले जात आहे, तर गोरक्षकांवर प्राणघातक आक्रमण होण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करा, तसेच गोरक्षकांना कायद्याचे साहाय्यक म्हणून काही अधिकार देण्यात यावेत आणि त्यांना सुरक्षा दिली जावी, असे श्री. चंद्रशेखर तांदळे यांनी सांगितले.

pune_rha6

कर्नाटक राज्य शासनाच्या वर्ष २०१६ च्या अर्थसंकल्पात अन्य धर्मियांच्या कल्याणासाठी खिरापत वाटल्याप्रमाणे निधीची तरतूद करण्यात आली आहे, तर हिंदूंच्या देवस्थानांसाठी दमडीचीही तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे कर्नाटक शासनाकडून अल्पसंख्य समुदायासाठी अर्थसंकल्पात देण्यात आलेला भरघोस निधी रहित करावा, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. नगरसेवक श्री. योगेश मोकाटे आणि धर्माभिमानी श्री. उमेश भेलके यांचे आंदोलनाला सहकार्य लाभले.

क्षणचित्रे

१. अयोध्येमध्ये रामजन्मभूमीवर श्रीरामनवमीच्या दिवशी प्रभु श्रीरामांची पूजा करण्यासाठी विशेष अनुमती देण्यात यावी, यासाठी एक स्वाक्षरी प्रभु श्रीरामासाठी ही स्वाक्षरी चळवळ राबवण्यात आली. त्याला समाजातून भरघोस प्रतिसाद मिळाला.

२. घर घर भगवा छायेगा, रामराज्य फिर आयेगा ।, एकही नारा, एकही नाम – जय श्रीराम, जय श्रीराम । आदी घोषणांमुळे वातावरण भगवे झाले होते.

३. आंदोलनस्थळी गणवेशातील, तसेच साध्या वेषातील पोलीस उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *