मुलुंड येथे ‘हिंदुजागृती डॉट ओ.आर्.जी.’ या संकेतस्थळाच्या धर्मप्रेमी वाचकांचा पहिला परिसंवाद पार पडला !
मुंबई : आजमितीला देशात विविध प्रकारचे जिहाद मोठ्या प्रमाणात कार्यान्वित आहेत. मुसलमानांसाठी वेगळ्या प्रदेशाची मागणी केली जात आहे. याआधीही धर्माच्या आधारावर देशाचे विभाजन करण्यात आले आहे. देशाचे असेच तुकडे होत राहिले, तर भविष्यात हिंदू नामशेष होण्यास वेळ लागणार नाही. हिंदूंवरील अन्यायाचे प्रमाण वाढतच आहे. हे रोखण्यासाठी धर्माधारित हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याची आवश्यकता आहे. यासाठी हिंदूंनी संघटित होऊन आतापासूनच हिंदु राष्ट्रासाठी कटीबद्ध व्हायला हवे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याचे संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. ‘हिंदुजागृती डॉट ओ.आर्.जी.’ या संकेतस्थळाचे नियमित वाचक असलेल्या धर्मप्रेमींसाठी आयोजित केलेल्या परिसंवादात ते बोलत होते.
मुलुंड येथील पद्मावती बँक्वेटमध्ये २९ फेब्रुवारीला सायंकाळी हा परिसंवाद पार पडला. हिंदु जनजागृती समितीच्या व्यापक कार्याची माहिती करून देणारी ध्वनीचित्रफीत या वेळी उपस्थितांना दाखवण्यात आली. मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतील हिंदुत्वनिष्ठ या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. बळवंत पाठक यांनी केले. या वेळी सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत व्यासपिठावर उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. घनवट यांनी उपस्थितांना हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात कटीबद्ध रहाण्याची शपथ दिली.
श्री. सुनील घनवट यांनी मांडलेली अन्य सूत्रे
१. ‘हलाल जिहाद’ नावाचा नवीन जागतिक जिहाद कार्यान्वित झाला असून केवळ दोनच वर्षांत त्याने भारताच्या एकूण अर्थव्यवस्थेएवढी अर्थव्यवस्था उभी केली आहे. याद्वारे गोळा केलेल्या धनाचा उपयोग जगभरातील आतंकवादी कारवायांत पकडण्यात आलेल्या आतंकवाद्यांचे न्यायालयीन खटले लढण्यासाठी केला जात आहे. याअंतर्गत नोंदणी झालेल्या उत्पादनांवर हिंदूंनी बहिष्कार घालायला हवा.
२. बहुसंख्यांकांच्याही आधी अल्पसंख्यांकांचा विचार करणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे. अल्पसंख्यांकांसाठी या देशात स्वतंत्र आयोग असून यासाठी चालू अर्थसंकल्पात ५ सहस्र २९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
३. भारतीय राज्यघटनेने अल्पसंख्यांकांना शाळांमध्ये त्यांच्या धर्मग्रंथांचे शिक्षण देण्याची मुभा दिली असून हिंदूंनी शाळांमध्ये धर्मग्रंथाचे शिक्षण देणे किंवा धार्मिक कृती करणे गुन्हा ठरते.
४. मुसलमानांच्या हजयात्रेला विमान प्रवासाच्या तिकिटात सवलत दिली जाते, तर हिंदूंच्या धार्मिक यात्रांना येणार्या यात्रेकरूंवर प्रवास तिकिटात आधिभार आकारला जातो.
५. देशातील ८ राज्यांत आज हिंदू अल्पसंख्य झाले असून सर्वच राज्यांत तसे प्रयत्न चालू आहेत.
६. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात येणार्या हिंदु राष्ट्र-जागृती सभांच्या माध्यमांतून मोठ्या प्रमाणात हिंदूसंघटन होत असून हिंदूंच्या साहाय्यासाठी हिंदु धावून जात आहे. असे संघटन प्रत्येक ठिकाणी होण्याची आवश्यकता असून एखाद्या हिंदूवर संकट आल्यास अन्य ठिकाणावरील हिंदूने हातातील काम सोडून त्याला साहाय्य करण्यासाठी जायला हवे.
७. धर्मासाठी प्रतिदिन किमान एक घंटा देणे, प्रतिदिन मंदिरात जाणे, दूरभाषवर ‘हॅलो’ न म्हणता ‘नमस्कार’ किंवा ‘जय श्रीराम’ असे म्हणणे, प्रतिदिन संपर्कातील ३ ते ४ जणांना धर्मजागृती विषयक माहिती देणे आणि हिंदु राष्ट्रासाठी कटीबद्ध रहाणे या आचारसंहिता प्रत्येक हिंदूने पाळायला हव्यात.
धर्मकार्य करतांना देवतेचा नामजप केल्यास ईश्वराचे पाठबळ लाभते ! – सौ. नयना भगत, प्रवक्त्या, सनातन संस्था
छत्रपती शिवाजी महाराजांसमोर ज्याप्रमाणे पाच पातशाह्या उभ्या ठाकल्या होत्या, तशी हिंदूंसमोर आजही अनेक संकटे ‘आ’ वासून उभी आहेत. जिजाबाईंनी शिवरायांना लहानपणापासून वीरपुरुषांच्या, संतांच्या कथा सांगून त्यांच्यावर शौर्याचे आणि उपासनेचे संस्कार केले. शिवरायांचे गुरु समर्थ रामदासस्वामी यांनी शिवरायांना ईश्वरी अधिष्ठानाचे महत्त्व पटवून दिले. त्यानुसार शिवरायांनी अखंड ‘जगदंब जगदंब’ असा जप करत शत्रूचा पाडाव केला. श्रीकृष्णाचा अखंड जप करणार्या अर्जुनाने सोडलेला प्रत्येक बाण लक्ष्यवेधी ठरत असे. आपण आपल्या कुलदेवीचा किंवा कुलदेवाचा नामजप करत धर्मकार्य केल्यास आपल्या कार्याला ईश्वरी पाठबळ लाभून हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यास वेळ लागणार नाही.
क्षणचित्रे
१. उपस्थित धर्मप्रेमींनी उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.
२. काही धर्मप्रेमींनी त्यांनी केलेल्या धर्मकार्याविषयी अनुभवकथन केले.
३. काही जणांनी धर्मकार्य करतांना येणार्या अडचणी मांडल्या. या अडचणींवर मात कशी करायची ? याविषयी श्री. घनवट यांनी मार्गदर्शन केले.
४. प्रत्येक मासात सर्वांनी एकत्र येऊन धर्माविषयी विचारविनिमय करून पुढील कार्याची दिशा ठरवावी, असे सर्वानुमते ठरवण्यात आले. कल्याण येथील एका धर्मप्रेमीने पुढील मासात एकत्रित बैठकीचे नियोजन करण्याची स्वत:हून सिद्धता दर्शवली.
५. ‘घराघरात जिजाऊ निर्माण व्हावी’, असे वाटत असेल, तर प्रत्येकाने आपली पत्नी, बहीण आणि आई यांनाही अशा बैठकांना बोलवावे. महिलांसाठी धर्मविषयक स्वतंत्र बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात यावे’, असे मत एका महिला धर्मप्रेमीने या वेळी व्यक्त केले.
६. कार्यक्रमस्थळी सनातनचे ग्रंथ आणि उत्पादने यांचा प्रदर्शनकक्ष उभारण्यात आला होता. त्याला भेट देऊन धर्मप्रेमींनी ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांची खरेदी केली.
७. कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित धर्मप्रेमींकडून ‘जय श्रीराम’, ‘जय भवानी-जय शिवाजी’, ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।’, ‘वन्दे मातरम् ।’, ‘छत्रपती शिवाजी महाराजकी जय’ अशा प्रकारच्या घोषणा उत्स्फूर्तपणे देण्यात येत होत्या.