Menu Close

नागरिकांनी एकमेकांना भेटल्यावर हस्तांदोलन न करता भारतीय पद्धतीने हात जोडून ‘नमस्ते’ म्हणा !

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे नागरिकांना आवाहन

हस्तांदोलन केल्यामुळे शारीरिक स्तरावर संसर्ग होतो, तसाच तो आध्यात्मिक स्तरावरही होतो. हात मिळवल्याने रज-तम या सूक्ष्म गुणांचा, तसेच अनिष्ट शक्तींचा संबंधितांना त्रास होण्याची शक्यता बळावते. यामुळेच हिंदु धर्मात ‘नमस्कार’ करण्यास सांगितला आहे ! कोरोनाच्या प्रभावामुळे का होईना जगालाही नमस्काराचे महत्त्व पटू लागले आहे. पाश्‍चात्त्यांचे अनुकरण करणारे आतातरी यातून बोध घेतील का ?

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू 

जेरूसलेम : ‘कोरोना’ हा साथीचा रोग असल्याने इतरांच्या संपर्कात येताच दुसर्‍यालाही त्याची लागण होते. यामुळे नागरिकांनी एकमेकांना भेटल्यावर हस्तांदोलन न करता भारतीय पद्धत म्हणजे हात जोडून ‘नमस्ते’ म्हणावे, असे आवाहन इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केले. ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नेतान्याहू यांनी एक आढावा बैठक घेतली. त्या वेळी बैठकीत त्यांनी उपाययोजनांची माहिती देण्यापूर्वी नागरिकांना वरील आवाहन केले. इस्रायलमध्ये आतापर्यंत १५ जणांना कोरोनाची लागण झाली असून अद्यापपर्यंत कुणाचाही मृत्यू झालेला नाही.

या वेळी नेतान्याहू यांनी पत्रकार परिषदेत दोन्ही हात जोडले आणि ‘नमस्ते’ म्हटले. तसेच भारतीय नागरिक इतरांना कसे भेटतात आणि स्वागत करतात, हे नागरिकांना समजावले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *