Menu Close

काळाप्रमाणे साधना करून धर्मरक्षण केल्यास मनुष्यजन्माचे सार्थक होईल ! – आधुनिक वैद्य श्रीपाद पेठकर

तावडी (जिल्हा सोलापूर) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जाहीर प्रवचन

प्रवचनाला उपस्थित जिज्ञासू

तावडी (जिल्हा सोलापूर) : प्रत्येकजण पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांद्वारे मिळणार्‍या क्षणिक सुखासाठी धडपडत असतो; पण साधना केल्यास चिरंतन टिकणारा आनंद अनुभवता येतो. त्यामुळे स्वत:च्या उद्धारासाठी काळाप्रमाणे साधना करून धर्मरक्षण केल्यास मनुष्यजन्माचे सार्थक होईल, असे प्रतिपादन आधुनिक वैद्य श्रीपाद पेठकर यांनी केले. ते येथील मारुति भैरवनाथ मंदिरामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने झालेल्या ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर बोलत होते. या प्रवचनाला १२० जिज्ञासू उपस्थित होते. या वेळी उपस्थितांनी प्रवचनाचा विषय मनापासून समजून घेतला.

आधुनिक वैद्य श्रीपाद पेठकर पुढे म्हणाले की, हिंदूंनी सण-उत्सव साजरे करतांना त्यात अपप्रकार होणार नाहीत, याची काळजी घ्यावी, तसेच हिंदु संस्कृतीप्रमाणे सण साजरे करावेत. हिंदु धर्म टिकला, तर राष्ट्र टिकेल.

विशेष

प्रवचनापूर्वी वारा आणि पाऊस चालू झाला होता. समितीच्या कार्यकर्त्यांसह काही धर्मप्रेमींनी मारुतीला प्रार्थना करून नामजप केला. त्यानंतर २० मिनिटांनी पाऊस थांबला आणि सर्वांना प्रवचनाला उपस्थित रहाता आले.

क्षणचित्रे

१. येथील श्री. अमोल बागल यांनी गावात दवंडीद्वारे प्रवचनाचा प्रसार केला.

२. श्री. सूरज अरगडे यांनी प्रवचनासाठी आवश्यक साहित्य, पटल, बैठका उपलब्ध केले, तसेच समितीच्या कार्यकर्त्यांसाठी चहा-पाण्याची व्यवस्था केली.

३. ग्रामपंचायत शिपायांनी प्रवचनाच्या ठिकाणची स्वच्छता केली, तर ग्रामस्थांनी ध्वनीक्षेपण यंत्रणेचीही व्यवस्था केली.

४. प्रवचनानंतर आवरण्यासाठीही ग्रामस्थांनी साहाय्य केले.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *