हिंदु जनजागृती समितीकडून कर्नाटकच्या हिंदु धर्मादाय विभाग सचिवांना ‘सरकारीकरण झालेल्या मंदिरांचे पावित्र्य राखण्या संदर्भात’ निवेदन सादर
बेंगळुरू (कर्नाटक) : बिअर बार यांना हिंदु देवतांची नावे देऊ नयेत, यासाठी जागृती करण्यात येत आहे. देवस्थानात वस्त्रसंहिता (ड्रेस कोड) लागू करण्याचा विचार असून तो लगेच लागू करणे शक्य नाही; परंतु त्या दिशेने जागृती करण्यासाठी आवश्यक कारवाई करण्यात येईल. पुढील ३ मासांत देवस्थानांच्या संपत्तीची माहिती आणि इतर कागदपत्रे संगणकीकृत केली जातील, अशी माहिती हिंदु धर्मादाय विभागाचे सचिव कोटा श्रीनिवास पुजारी यांनी दिली. ‘सरकारीकरण झालेल्या मंदिरांचे पावित्र्य, व्यवस्था, धार्मिक श्रद्धा, भावना यांना धक्का लागणार नाही, अशी कारवाई करावी’, अशी मागणी करणारे निवेदन हिंदु जनजागृती समितीकडून कोटा श्रीनिवास पुजारी यांना देण्यात आले. त्यावर ते समितीच्या कार्यकर्त्यांशी बोलत होते.