याविषयी सरकारने संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
मुंबई : मी आदिवासी क्षेत्रात काम करत आहे. आदिवासींना ‘तुम्ही हिंदु नाही’, असे सांगून त्यांना हिंदू धर्मापासून वेगळे करण्याचे मोठे षड्यंत्र आखले जात आहे. असे जर झाले, तर हिंदु समाजासमोर मोठी समस्या निर्माण होऊ शकते. आदिवासींमध्ये धर्मांतराचे प्रकारही घडत आहेत. याला आळा घालण्यासाठी शासनाने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन भाजपचे आर्णी, यवतमाळ येथील आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी केले. आमदार डॉ. धुर्वे आणि आमदार प्रकाश भारसाकळे यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘सनातन पंचांग २०२०’ भेट देण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. सतीश सोनार आणि श्री. अरविंद पानसरे उपस्थित होते.