Menu Close

‘हलाल सर्टिफिकेट’विषयी जनजागृती करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उद्योजकांसाठी प्रबोधन

‘हलाल’ प्रमाणित उत्पादनांच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेण्याचा कोल्हापूर येथील उद्योजकांचा निर्धार

कोल्हापूर : ‘हलाल’ प्रमाणित उत्पादनांच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी बैठकांचे आयोजन करणे, या संदर्भात होणार्‍या आंदोलनांमध्ये सहभागी होणे, हिंदु उत्पादकांकडूनच उत्पादने खरेदी करण्यासाठी प्राधान्य देणे, अशा प्रकारे पुढाकार घेण्याचा निर्धार उद्योजकांनी व्यक्त केला.

‘हलाल सर्टिफिकेट’विषयी जनजागृती करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ७ मार्च या दिवशी ‘हॉटेल इंटरनॅशनल’ येथे उद्योजकांसाठी प्रबोधन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत हिंदु जनजागृती समितीचे गुजरात राज्य, कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्र विभागाचे समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी ‘हलाल सर्टिफिकेट’द्वारे भारताला इस्लामीकरणाचा धोका कसा आहे, याविषयी सविस्तर विवेचन केले. यानंतर उपस्थित उद्योजकांनी वरील निर्धार व्यक्त केला.

बैठकीत एका उद्योजकाने ‘हलाल सर्टिफिकेट’चा पैसा आतंकवादी कारवायांसाठीच वापरला जातो, याचे पुरावे आहेत का ?’, असा प्रश्‍न उपस्थित केला. त्यास उपस्थित उद्योजकांनी उत्तर दिले. यानंतर श्री. मनोज खाडये यांनी ‘भारतात हलाल प्रमाणपत्र देणार्‍या अनेक संघटनांपैकी ‘जमियत उलेमा-ए-हिंद’ ही संघटना आतंकवादी घटनांतील धर्मांध आरोपींसाठी कायदेशीर साहाय्य उपलब्ध करून देत असून अशा एकूण ७०० जणांचे खटले लढवत आहे. यापेक्षा ढळढळीत पुरावा कोणता हवा ?’, असा प्रतिप्रश्‍न त्या उद्योजकांना केला. ‘इतके दिवस अनेक जिहाद आले; मात्र हा अशा प्रकारचा जिहाद आहे की, हिंदू जागृत झाले नाही, तर त्यांचे अस्तित्वच धोक्यात येईल. त्यामुळे आपल्याला याच्या विरोधात कृतीशील व्हावेच लागेल’, असे आवाहन श्री. खाडये यांनी या वेळी केले.

क्षणचित्रे

१. कार्यक्रमाला आलेल्या एका उद्योजकांनी अन्य ८ जणांना दूरभाष करून कार्यक्रमासाठी निमंत्रित केले. कार्यक्रमस्थळी आल्यावरही त्यांनी अगत्याने दूरभाष करून ‘अन्य सर्व बाजूला ठेवून या कार्यक्रमासाठी येणे अत्यावश्यक आहे’, असे सांगितले. ‘अशा प्रकारचे आणखी कार्यक्रम आयोजित करण्यासाठी त्यांच्याशी संबंधित असलेले सभागृह उपलब्ध करून देऊ’, असे सांगितले.

२. पट्टणकुडी येथील युवा उद्योजक श्री. संदीप मिठारी यांनी अशा प्रकारचा कार्यक्रम पट्टणकुडी येथे आयोजित करण्याची सिद्धता दाखवली.

३. एका उद्योजकाने ‘मी गेल्या अनेक कालावधीपासून केवळ हिंदु व्यक्तीकडूनच वस्तू खरेदी करतो. आमच्या घरातील महिलाही ते काटेकोरपणे करतात. एखादी वस्तू मिळाली नाही, तर प्रसंगी चार दिवस थांबतो; मात्र हिंदूंकडून वस्तू खरेदी करण्यास माझा कटाक्ष असतो’, असे सांगितले.

विशेष

१. कार्यक्रमाच्या कालावधीत अन्य एका कार्यक्रमासाठी काही महिला ‘हॉटेल इंटरनॅशनल’ येथे उपस्थित होत्या. कार्यक्रमस्थळी लावण्यात आलेली सनातनची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचे प्रदर्शन पाहून त्यांनी सात्त्विक उत्पादने अन् ग्रंथ घेतले.

२. श्री. मनोज खाडये यांचे मार्गदर्शन चालू असतांना अनेक वेळा उद्योजकांनी उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवून त्यांच्या वक्तव्यांना दाद दिली.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *