Menu Close

अमेरिकेतील नेते आणि प्रसारमाध्यमे हिंदूंविषयी द्वेष पसरवतात : तुलसी गबार्ड

  • भारतातीलच नव्हे, तर अमेरिकेतील नेते आणि प्रसारमाध्यमे हे एकाच माळेचे मणी आहेत, हे यातून लक्षात येते !
  • जिहादी आतंकवाद्यांना सोडून निरपराध, निष्पाप आणि सहिष्णु हिंदूंना ‘आतंकवादी’ ठरवण्याचे हे एक आंतरराष्ट्रीय षड्यंत्रच आहे, हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने त्या विरोधात कठोर पावले उचलली पाहिजेत !
  • अमेरिकेतील महिला हिंदु खासदार हिंदूंची बाजू घेते; मात्र भारतातील काही ठराविक हिंदु नेते वगळता बहुतांश हिंदु लोकप्रतिनिधी हिंदूंना दूषणे देण्यात धन्यता मानतात, हे लज्जास्पद !

वॉशिंग्टन (अमेरिका) : दुर्दैवाने ‘हिंदूफोबिया’ (हिंदूंचा द्वेष करणे) हे एक सत्य आहे. मी काँग्रेसची आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवार म्हणून प्रचार करतांना प्रत्येक वेळी हे अनुभवले आहे. आमच्या देशात हिंदूंना किती सहन करावे लागत असेल ? तरीही आमचे नेते आणि प्रसारमाध्यमे याविषयी गप्प बसतात अन् हिंदूंचा द्वेष करतात, हे अधिक दुःखद आहे, असे ट्वीट अमेरिकेतील पहिल्या हिंदु महिला खासदार तुलसी गबार्ड यांनी केले.

मानसोपचार तज्ञ असलेल्या डॉ. शीनी अब्राडर यांनी भारतातील एका हिंदु महिलेची ‘पोस्ट’ प्रसारित केली होती. त्याचा संदर्भ देत तुलसी गबार्ड यांनी हे ट्वीट केले आहे. डॉ. शीनी अब्राडर यांनी प्रसारित केलेल्या या ‘पोस्ट’मध्ये एक मुसलमान टॅक्सीचालक हिंदु महिलेशी हुज्जत घालून देहली येथील दंगलीला हिंदूंना उत्तरदायी ठरवत असल्याचे म्हटले आहे.

या महिलेने ‘पोस्ट’मध्ये लिहिले होते की,

१. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी केलेल्या चुकीच्या वार्तांकनामुळे देहलीमधील दंगल मुसलमानांच्या विरोधात करण्यात आली, असे प्रसारित झाले आणि त्यामुळे हिंदूंना ‘खलनायक’ ठरवण्यात आले. तसेच हिंदूंच्या विरोधात प्रसारमाध्यमे आक्रमकही होत आहेत.

(३ दशकांपूर्वी काश्मीरमध्ये मशिदींवरील ध्वनीपेक्षकांद्वारे हिंदूंना त्यांच्या महिला आणि संपत्ती सोडून जाण्यास सांगण्यात आले होते. तसे न करणार्‍या हिंदूंच्या हत्या करण्यात आल्या, महिलांवर बलात्कार करण्यात आले. याविषयीचे वृत्त आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी कधीही दिले नाही. हीच प्रसारमाध्यमे आता देहलीतील दंगलीविषयी खोटी वृत्ते प्रकाशित करून हिंदूंना उत्तरदायी ठरवत आहेत, ही हिंदुद्वेषी पत्रकारिता होय ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

२. जेव्हा मी उबेर टॅक्सी आरक्षित केली, तेव्हा तो मुसलमान चालक मला देहली दंगलीविषयी सांगू लागला.

३. तो म्हणाला, ‘‘भारतात हिंदू हे मुसलमानांना मारत आहेत, मशिदी तोडत आहेत.’’ (देहलीतील दंगलींवरून जगभरातील मुसलमानांमध्ये हिंदूंच्या विरोधात कसा अपप्रचार केला आहे, हेच यातून दिसून येते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) त्यावर मी त्याला ‘तसे नाही’, हे सांगण्याचा प्रयत्न केला, तर तो रागावला आणि मला अन् माझ्या बहिणीला टॅक्सीतून खाली उतरवले. यामुळे मी पोलिसांना बोलावले आणि प्रकरण मिटवले.

४. देहली दंगलीच्या एकतर्फी आणि हिंदुविरोधी पत्रकारितेमुळे अशी स्थिती निर्माण झाली आहे. विदेशात ‘हिंदूफोबिया’ वाढत आहे आणि हिंदूंच्या विरोधात लोकांच्या मनात अपसमज निर्माण होत आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *