Menu Close

‘येस’ बँकेत अडकले पुरीच्या जगन्नाथ मंदिराचे ५९२ कोटी रुपये

तिरुपती देवस्थानने गेल्याच मासात काढले होते १ सहस्र ३०० कोटी रुपये

‘जगन्नाथ मंदिर, तिरुपती मंदिर ही मंदिरे सरकारीकरण झालेली असतांना त्यांचे पैसे खासगी बँकेत कसे ठेवले जातात ?’, ‘सरकारी बँकांमध्ये हे पैसे का ठेवले जात नाहीत?’, याची उत्तरे सरकारने हिंदु भाविकांना दिली पाहिजेत !

नवी देहली : आर्थिक डबघाईला आलेल्या ‘येस’ बँकेत पुरी येथील भगवान जगन्नाथ मंदिराचे ५९२ कोटी रुपये अडकल्याचे समोर आले आहे. गेल्या मासातच तिरुमला तिरुपती देवस्थानने त्याचे १ सहस्र ३०० कोटी रुपये या बँकेतून काढून घेतल्याची माहितीही समोर येत आहे.

सध्या रिझर्व्ह बँकेने या बँकेतून प्रत्येक मासाला ५० सहस्र रुपयांहून अधिक रुपये काढण्यास ३ एप्रिलपर्यंत मनाई केली आहे. या बँकेला वाचवण्यासाठी २० सहस्र कोटी रुपयांची आवश्यकता आहे. या पार्श्‍वभूमीवर स्टेट बँकेने २ सहस्र ४५० कोटी रुपये येस बँकेत गुंतवून त्याची ४९ टक्के मालकी खरेदी करण्याची घोषणा केली आहे. येस बँकेचे अधिकृत भांडवल ५० सहस्र कोटी रुपये असल्याचे स्टेट बँकेने निश्‍चित केले आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, आम्ही जी ३० दिवसांची मुदत दिली, ती कमाल मुदत आहे. या कालावधीत समस्येवर तोडगा काढला जाईल.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *