देहलीतील दंगलीच्या पार्श्वभूमीवर पाकच्या पंतप्रधानांचा थयथयाट
- ‘भारताच्या विरोधात डाळ शिजत नाही’, हे लक्षात आल्यावर आता जगभरातील इस्लामी राष्ट्रांना भारताच्या विरोधात चिथावून भारताची हानी करण्याचा पाकचा डाव आहे. पाक अस्तित्वात असेपर्यंत तो कुरापती काढतच रहाणार. त्यामुळे त्याला जगाच्या नकाशावरून संपवणे, हेच इष्ट !
- स्वतःच्या देशात अल्पसंख्यांक हिंदूंवर होत असलेले अत्याचार आणि त्यांच्या हत्या यांविषयी इम्रान खान बोलतील का ?
- देहलीतील दंगल घडवण्यामागे भारतातील धर्मांधांचा हात असण्यासह ती दंगल घडवण्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे उघड होत आहेत, याविषयी पाकचे पंतप्रधान बोलतील का ?
इस्लामाबाद : देहलीत झालेल्या हिंसाचाराच्या सूत्रावरून भारताच्या विरोधात एकत्र येण्याविषयी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी इस्लामी देशांना ट्वीटद्वारे चिथवले आहे. नुकतेच इराणने देहलीत झालेल्या हिंसाचारावरून भारताचा निषेध केला. त्यानंतर इम्रान खान यांनी वरील आवाहन केले. अन्य इस्लामी राष्ट्रांनी प्रतिक्रिया व्यक्त न केल्याने त्यांनी अप्रसन्नताही दर्शवली. इम्रान खान यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, मुसलमान जगताने भारतातील हिंसाचाराच्या विरोधात फार अल्पसंख्येने स्वतःहून निषेध नोंदवला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हिंदु वर्चस्ववादी सरकारच्या विरोधात पाश्चिमात्य देशांनी आवाज उठवला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात