Menu Close

प्रखर सावरकरनिष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांच्या गाडीवर आक्रमण

नगर : येथे प्रखर सावरकरनिष्ठ अभिनेते शरद पोंक्षे आले असता आक्रमणकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केल्याने त्यांच्या गाडीच्या काचा फुटल्या. त्या वेळी गाडीत कुणी नसल्याने कुणालाही दुखापत झाली नाही. १०० व्या अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या संदर्भातील पत्रकार परिषद चालू असतांना गाडी जिथे उभी करण्यात आली होती, त्या ठिकाणी हे आक्रमण झाल्याचे समजते.

प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि स्वातंत्र्यवीर सावरकरनिष्ठ पोंक्षे यांच्या सडेतोड भूमिका काहींना पचनी पडणे कठीण होत असल्याची चर्चा होत आहे. पुरोगामी विद्यार्थी संघटना, तसेच जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना पूर्वी विरोध केला आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *