हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षणवर्गातील युवकांची अभिनंदनीय कृती
सोलापूर : शहरातील अनेक जण भग्न झालेल्या देवतांच्या मूर्ती, जुने देवतांचे चित्र, पूजासाहित्य रस्त्यावरील कचराकुंडी अथवा मंदिर परिसर येथे ठेवतात. त्यामुळे देवतांची विटंबना होते. ही विटंबना रोखण्यासाठी येथील धर्मप्रेमी युवकांनी या साहित्याचे अग्नीविसर्जन केले. हे धर्मप्रेमी युवक हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षणवर्गात येतात.
येथे फेब्रुवारीमध्ये झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेनंतर घोंगडेवस्ती येथील श्री दत्त मंदिरामध्ये धर्मशिक्षणवर्ग चालू करण्यात आला. या वर्गामध्ये येणार्या युवकांना धर्मशिक्षण आणि देवतांचे विटंबन रोखणे यांचे महत्त्व हिंदु जनजागृती समितीचे श्री. विक्रम घोडके यांनी सांगितले. धर्मप्रेमी युवकांनी ग्रामदेवता श्री रूपाभवानी देवीचे दर्शन घेऊन साहित्याचे अग्नीविसर्जन केले.
या वेळी सर्वश्री माल्लेश पुजारी, विशाल वंगा, वेणुगोपाल रंगम, अप्पा शहापुरे, अभिषेक कोळी, सिद्धराम पुजारी, लक्ष्मीकांत नायकुडे, नागेश कोंडाबत्ती, विशाल विटकर, दीपक भागानगरे, रूपाभवानी देवीचे पुजारी श्री. प्रदीप पतंगे, तसेच कु. अंबिका कोळी आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. विक्रम घोडके आदी धर्मप्रेमी या मोहिमेत सहभागी झाले होते.