मुंबई : जळगाव येथील शिवसेनेचे आमदार श्री. किशोर आप्पा पाटील यांना ‘हलाल प्रमाणपत्रा’विषयी लिखाण असलेला दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक भेट देण्यात आला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट आणि श्री. सतीश सोनार उपस्थित होते.
‘हलाल प्रमाणपत्रा’च्या माध्यमातून चालू असलेल्या षड्यंत्राची सविस्तर माहिती देण्यासाठी व्यापार्यांची बैठक घेऊ ! – आमदार प्रदीप जयस्वाल, शिवसेना
मुंबई : हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट अन् समितीचे कार्यकर्ते श्री. सतीश सोनार यांनी संभाजीनगर येथील शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार श्री. प्रदीप जयस्वाल यांची विधान भवनातील पक्ष कार्यालयात भेट घेतली.
अनेक ठिकाणी इमारतीमधील जिने, संरक्षक भिंत, कोपरे, तसेच अन्य ठिकाणी थुंकू नये आणि कचरा टाकू नये, यांसाठी त्या ठिकाणी देवता, तसेच धार्मिक प्रतीकांच्या टाईल्स लावण्यात येतात. त्यावर बंदी घालण्यात यावी, याविषयीच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. याशिवाय गृहनिर्माण कायद्यात त्याविषयी योग्य ती तरतूद करण्यात यावी, यासाठी प्रयत्न करण्याची विनंतीही त्यांना करण्यात आली.
या वेळी श्री. सुनील घनवट यांनी ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या माध्यमातून चालू असलेल्या षड्यंत्राची सविस्तर माहिती आमदार श्री. जयस्वाल यांना दिली. यावर श्री. जयस्वाल म्हणाले, ‘‘अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यावर संभाजीनगर येथे व्यापारी संघटना आणि व्यापारी यांची बैठक आयोजित करून याविषयी जागृती करण्यासाठी प्रयत्न करीन.’’