‘हलाल’विषयीच्या जागृतीमुळे उद्योजक आणि व्यापारी कृती करण्यास उद्युक्त
मिरज
‘हलाल’चा शिक्का असलेल्या उत्पादनांचे सध्या पुष्कळ स्तोम माजले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी सर्व राष्ट्राभिमानी नागरिकांनी सजग व्हावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे गुजरात राज्य, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र विभागाचे समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले. ब्राह्मणपुरी येथील राघवेंद्र स्वामी मठात ७ मार्च या दिवशी आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी व्यापारी सेनेचे श्री. पंडित (तात्या) कराडे, श्री. नितीन भोरावत, उद्योजक श्री. दिगंबर कोरे, श्री. रवि शिंदे यांच्यासह २५ जण या प्रसंगी उपस्थित होते.
क्षणचित्रे
१. शिवसेनेचे श्री. माधवराव गाडगीळ यांनी बैठकीनंतर लगेचच मिरज शहरात पाच दुकानांत जाऊन सर्व उत्पादने तपासून ‘हलाल’ शिक्का असलेली उत्पादने शोधून काढली. यानंतर श्री. गाडगीळ यांनी या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याविषयी दुकानदारांचे प्रबोधन केले.
२. शिवसेनेचे सांस्कृतिक आघाडी प्रमुख आणि व्यावसायिक श्री. आनंद रजपूत यांनी त्यांच्या दुकानात ‘हलाल सर्टिफिकेट’ असलेली उत्पादने शोधून काढून ती मुख्य वितरकाकडे त्वरित परत पाठवली.
पलूस
येथील श्री चौंडेश्वरी मंदिरात आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्राचार्य बी.एन्. पवार, अधिवक्ता चंदू फाळके, श्री. आखाराम शिसाळ, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. सुधीर शिसाळ यांसह ३५ जण उपस्थित होते. टाकळी (मिरज) येथील श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. सचिन भोसले हे मिरजेत झालेल्या बैठकीत विषय समजून घेतल्यानंतरही पलूस येथे आवर्जून उपस्थित होते.
विशेष
छत्रपती संभाजी महाराज बलीदान मासाच्या प्रार्थनेसाठी एकत्रित आलेल्या २० धारकर्यांनी प्रार्थनेनंतर श्री. मनोज खाडये यांची भेट घेतली. ‘श्री. खाडये यांच्याकडून ‘हलाल’ संदर्भातील विषय ऐकल्यावर लवकरच एका व्यापक बैठकीचे आयोजन करू’, असे या युवकांनी सांगितले.
दोन्ही ठिकाणी झालेल्या बैठकांमधून समाजात ‘हलाल’विषयी जागृती होत असून उद्योजक, व्यापारी, नागरिक त्वरित कृती करण्यासाठी उद्युक्त होत असल्याचे लक्षात येत आहे. हिंदु जनजागृती समितीवरील विश्वास वृद्धींगत होत असल्याचे हे निर्देशक आहे.