भाजप शासनाचा अभिनंदनीय निर्णय
बेंगळुरू : कर्नाटकमधील भाजप सरकारने राज्यातील ‘शादी भाग्य योजना’ बंद केली आहे. सरकारने यापूर्वीच अर्थसंकल्पात या योजनेसाठी कोणतीही आर्थिक तरतूद केली नव्हती. या योजनेनुसार अल्पसंख्यांकांमधील तरुणींना विवाहासाठी ५० सहस्र रुपयांचे साहित्य देण्यात येत होते. शासनाच्या अल्पसंख्यांक कल्याण विभागाने काँग्रेस सरकारच्या काळात ही योजना बनवली होती.
योजना हवी असणार्यांनी पाकमध्ये जावे ! – भाजपचे आमदार बसनगौडा पाटील यतनाल
भाजपचे आमदार बसनगौडा पाटील यतनाल यांनी याविषयी म्हटले की, मागील काँग्रेस सरकारने अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनासाठी ही योजना बनवली होती. भाजप शासनाने ती बंदी केली, याचे मी स्वागत करतो. आमचे शासन धर्मनिरपेक्ष आहे. अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन कशाला करायला हवे? ज्यांना ही योजना हवी आहे, त्यांनी पाकिस्तानमध्ये जावे. पाकिस्तान त्यांना सर्व योजना देईल.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात