निपाणी : ‘हलाल’ प्रमाणपत्र असलेल्या उत्पादनांचा पैसा आतंकवादी कारवायांसाठी वापरला जात आहे. या विषयाच्या संदर्भात जागृती करण्यासाठी वाल्मिकी समाज मंदिर येथे १० मार्च या दिवशी हिंदु जनजागृती समितीचे गुजरात राज्य, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र विभागाचे समन्वयक श्री. मनोज खाडये यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. या मार्गदर्शनाला उपस्थित व्यापारी, उद्योजक आणि वितरक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
प्रारंभी हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा परिचय करून दिला, तर सूत्रसंचालन श्री. जुगलकिशोर वैष्णव यांनी केले.
क्षणचित्रे
१. मार्गदर्शनानंतर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्री. विनोद मगदूम म्हणाले, ‘‘अधिकाधिक लोकांमध्ये या विषयाच्या संदर्भात जागृती करूया.’’
२. वितरक श्री. तुषार माळी यांना हा विषय समजल्यावर त्यांनी तात्काळ त्यांच्याकडील सर्व उत्पादनांची पडताळणी करून ‘हलाल’ प्रमाणपत्र असलेली सर्व उत्पादने संबंधित आस्थापनांना परत पाठवली आणि ‘यापुढे आम्हाला अशी उत्पादने पाठवू नयेत’, असे आस्थापनांना कळवले.