Menu Close

मुंबई येथे हिंदु जनजागृती समितीच्या ‘प्रथमोपचार पथका’द्वारे जनजागृती

मुंबई : होळी उत्सवात घडणार्‍या दुर्घटनांविषयी प्रबोधन आणि दुर्घटना घडल्यास उपचार करण्यासाठी १० मार्च या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या प्रथमोपचार पथकाद्वारे पश्‍चिम मुंबईत कांदिवली, गोराई, चारकोप येथे तसेच भांडुप पूर्व आणि पश्‍चिम येथे रुग्णवाहिका फिरवण्यात आली. भांडुप येथे या उपक्रमासाठी पंचमुखी सेवा संस्थानच्या वतीने रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली. यामध्ये भाजपचे कोकण विकास आघाडीचे रत्नागिरी संपर्क प्रमुख श्री. राजेश गोलपकर, सनातन संस्थेचे श्री. रमेश घाटकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. गोविंद दळवी, परिचारिका सौ. वनिता धुमाळ यांसह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

पश्‍चिम मुंबईतील प्रथमोपचार पथकात डॉ. (सौ.) प्राची मोडक, सनातन संस्थेचे श्री. भूषण देवरूखकर आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. देवीदास देवळे सहभागी झाले होते.

विशेष

१. ‘नैसर्गिक रंग वापरून आदर्श पद्धतीने धूलिवंदन खेळणे योग्य आहे. रासायनिक रंगांचा वापर करून होळी खेळतात, हे पाहून वाईट वाटते. सध्या ‘कोरोना’मुळे भयाचे वातावरण असूनही तुम्ही समाजासाठी ‘प्रथमोपचार वाहन’ फिरवतांना पाहून अजूनही समाजात चांगली माणसे आहेत याची जाणीव झाली.’ – कर्तव्यावरील पोलीस शिपाई अनिता शिंगारे आणि विष्णू कांगणे

२. हा उपक्रम राबवतांना नाहूर येथे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांवर पथकाद्वारे उपचार करण्यात आले.

समाजातील लोकांच्या प्रतिक्रिया

१. शाहीन बाग येथे अनेक मुसलमान त्यांचा धर्म धोक्यात येत आहे म्हणून एकत्र येऊन केंद्र सरकार विरुद्ध लढत आहेत; परंतु आजपर्यंत हिंदु धर्मावर अनेक संकटे येऊनही आपण हिंदू अजूनही एकत्र येत नाही, त्याचे वाईट वाटते. हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते समाजासाठी ‘प्रथमोपचार वाहन’ फिरवतांना पाहून आनंद वाटला. – श्री. अविनाश वीर, कोकण नगर, भांडुप

२. आम्ही तरुण मद्य पिऊन आपल्याच मस्तीत होळी खेळण्यात दंग आहोत. तुम्ही तुमचे काम सोडून आमच्या हितासाठी फिरत आहात याची मला लाज वाटत आहे. मी तुमच्या सारखे कार्य करत नाही. – श्री. प्रशांत दळवी, भांडुप

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *