Menu Close

दोषरूपी संस्कार गुणरूपी संस्कारात परिवर्तित झाल्यावरच जीवन आनंदी होते : श्रीमती अलका व्हनमारे

जागतिक महिलादिनानिमित्त ज्योतिर्मय योग आणि निसर्गोपचार केंद्र यांच्या वतीने व्याख्यान

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) : धावपळीच्या जीवनात मन स्वास्थ्य टिकवणे अत्यावश्यक झाले आहे. मनावर अयोग्य संस्कार दृढ झाल्यास ते घालवण्यासाठी कठोर प्रयत्न करावे लागतात. आपल्यातील दोषरूपी संस्कार गुणरूपी संस्कारात परिवर्तित झाल्यावरच आपण जीवनात आनंदी होऊ शकतो. यासाठी श्‍वासावर लक्ष केंद्रीत करणे, उपास्यदेवतेचा नामजप करणे, स्वयंसूचना देणे या उपायांच्या माध्यमातून आपल्या मनोबलाचे रूपांतर आत्मबलामध्ये करून आपणही इतिहासात होऊन गेलेल्या झाशीची राणी लक्ष्मीबाई, राणी पद्मावती अशा वीरांगनांप्रमाणे आदर्श स्त्रिया होऊ शकतो, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या श्रीमती अलका व्हनमारे यांनी केले. जागतिक महिलादिनानिमित्त ज्योतिर्मय योग आणि निसर्गोपचार केंद्र यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजित केलेल्या व्याख्यानात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला २०० महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन निसर्गोपचार तज्ञ डॉ. ज्योती शेट्ये यांनी केले होते.

या वेळी शारीरिक स्वास्थ्य टिकवण्यासमवेत मानसिक स्वास्थ्य टिकवणे आवश्यक आहे. यासाठी ‘मन:शांती मिळवण्यासाठीचे उपाय’ या विषयावर विविध तज्ञांनी मार्गदर्शन केले. या वेळी होमिओपॅथी आणि सायकॉलॉजी कन्सल्टंट डॉ. संगीता पाटील, प्रभा हिरा प्रतिष्ठानच्या श्रीमती मंगलाताई शहा, अग्निहोत्र आणि वेद प्रचार प्रसारक श्रीमती मेधा दाते आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.

क्षणचित्रे

१. कार्यक्रमानंतर अनेक महिलांनी श्रीमती अलका व्हनमारे यांच्याकडून नामजपाची सविस्तर माहिती जाणून घेतली, तसेच सविस्तर माहिती मिळण्यासाठी आणखी एक कार्यक्रम घेण्याची मागणी केली.

२. या कार्यक्रमानंतर काही महिलांनी श्रीमती अलका व्हनमारे यांना ‘कार्यक्रमातील विषय पुष्कळ आवडला आणि आम्ही नामजपाला प्रारंभ केला आहे’, हे सांगण्यासाठी पंढरपूर येथून दूरभाष केले.

विशेष सूत्र

कार्यक्रमाचा प्रारंभ आणि शेवट कोरोना विषाणूपासून रक्षण करणारा मंत्र म्हणत ‘अग्निहोत्र’ करून करण्यात आला. अग्निहोत्र करण्यापूर्वी कापराचे महत्त्व सांगतांना श्रीमती मेधा दाते म्हणाल्या की, अग्निहोत्र करण्यासाठी सनातन संस्थेचा आयुर्वेदिक भीमसेनी कापूर उत्कृष्ट आहे. सनातनचा कापूर महाग असला, तरी गुणकारी आहे. आपण साड्या खरेदी करतांना पैशाचा विचार करत नाही, मग कापूर ही आवश्यक गोष्ट असतांना पैशांचा विचार का करायचा ?

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *