पाकच्या सैन्यातील अधिकार्यांना कोरोनाची लागण
कोरोनाला घाबरणारे पाकचे सैनिक म्हणे भारताशी युद्ध करणार !
नवी देहली – कोरोनामुळे जगातील अनेक देशांचे सैन्य साहाय्यासाठी रस्त्यावर उतरले आहे; मात्र पाकचे सैनिक तेथील जनतेच्या आपत्कालीन साहाय्यासाठी जाण्यास घाबरू लागले आहेत, असे चित्र समोर आले आहे. पाकचे न्यूनतम ८ अधिकारी कोरोनाने बाधित झाले आहेत. यामध्ये ३ लेफ्टनंट कर्नल, २ कर्नल, २ ब्रिगेडियर आणि १ मेजर जनरल यांचा समावेश आहे.
Together we can, and together we will defeat Corona Virus; let’s join hands to safeguard ourselves and our loved one ??#CoronaFreePakistan pic.twitter.com/7FX7gwKOGq
— Prime Minister’s Office, Pakistan (@PakPMO) March 2, 2020
ही माहिती पाकिस्तानी आरोग्य मंत्रालयानेच दिली आहे. पाकिस्तानमध्येही कोरोनाचे ३० रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत ९ लाख लोकांची पडताळणी करण्यात आली आहे. पाकमध्ये केवळ तीनच विमानतळ चालू ठेवण्यात येणार आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात