छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध करणार्या ख्रिस्त्यांना प्रत्युत्तर देणार्या सर्व शिवप्रेमींचे अभिनंदन ! असे तत्पर धर्मप्रेमी हीच हिंदूंची खरी शक्ती आहे !
महाराष्ट्रातील व्यक्तीमत्त्वाचा पुतळा गोव्यात उभारल्याने गोमंतकियांचे अस्तित्व धोक्यात येणार असल्याचा ख्रिस्त्यांचा कांगावा
शिवसेनेची ख्रिस्त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार
म्हापसा : येथील हुतात्मा चौकाच्या परिसरात अलीकडेच स्थापन करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्यास जोस लोबो यांच्या नेतृत्वाखालील ख्रिस्ती गटाने म्हापसा पालिकेकडे विरोध दर्शवला आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पुतळ्याचे एप्रिल मासात भव्य कार्यक्रमांतर्गत अनावरण करण्याचे निश्चित आहे. असे असूनही पुतळ्याला होत असलेला विरोध लक्षात घेऊन म्हापसा येथील शिवप्रेमींनी तातडीने १४ मार्चच्या रात्री ८.३० वाजता मोठ्या संख्येने एकत्रित येऊन घोषणांच्या जयजयकारात पुतळ्याचे अनावरण केले. म्हापसा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला विरोध करणारे जोस लोबो आणि त्यांचे साथीदार यांनी धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केल्यामुळे कायदा अन् सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे जोस लोबो आणि त्यांचे साथीदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे राज्यप्रमुख जितेश कामत, सचिव मंदार पार्सेकर आदींनी म्हापसा पोलीस ठाण्यात केली आहे.
सविस्तर वृत्त असे की,
१. म्हापसा पालिकेच्या अनुज्ञप्तीने शिवप्रेमींनी शिवरायांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या ठिकाणी आठवड्यापूर्वी पूर्णाकृती पुतळा स्थानापन्न केला होता. जिल्हा पंचायत निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते भव्यदिव्य स्वरूपात या पुतळ्याचे अनावरण करण्याचे शिवप्रेमींनी ठरवले होते.
२. १३ मार्च या दिवशी जोस लोबो आणि त्यांचे सुमारे १५ साथीदार यांनी म्हापसा येथील हुतात्मा चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याला विरोध असल्याचे पत्र म्हापसा पालिकेच्या नगराध्यक्षांना दिले.
३. पुतळ्याला विरोध झाल्याचे लक्षात आल्यावर १४ मार्चच्या रात्री ८.३० वाजता शिवप्रेमींनी एकत्र येऊन श्री बोडगेश्वरदेवाच्या गळ्यातील पुष्पहार घालून पुतळ्याचे विधीवत उद्घाटन केले. यासाठी ‘नारी शक्ती’च्या निशा वेर्णेकर, ‘गोमंतक हिंदू प्रतिष्ठान’चे अंकित साळगावकर आदींनी पुढाकार घेतला. जोस लोबो यांच्या कृतीमुळे संतप्त झालेले शिवप्रेमी, तसेच हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.
जोस लोबो यांच्या कृतीचा हिंदुत्वनिष्ठांकडून निषेध
शिवसेनेचे माजी राज्यप्रमुख रमेश नाईक, माजी नगरसेवक आनंद भाईडकर, हिंदुत्वनिष्ठ जयेश थळी, नगरसेवक तुषार टोपले आदींनी जोस लोबो यांच्या कृतीचा निषेध केला आहे.
शिवरायांच्या पुतळ्यास विरोध केल्याविषयी शिवसेनेकडून निषेध व्यक्त
‘अखंड हिंदुस्थान’चे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवू नये, अशी मागणी करणारे जोस लोबो आणि त्यांचे साथीदार यांच्या कृतीचा शिवसेना निषेध करत आहे, असे शिवसेनेचे गोवा राज्यप्रमुख जितेश कामत यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.
जितेश कामत यांनी म्हटले आहे की,
१. जोस लोबो यांनी प्रथम गोव्याचा इतिहास नीट वाचावा. १७ व्या शतकात गोव्यातील एकूण १२ तालुक्यांतील ८ तालुक्यांत शिवाजी महाराजांचे राज्य होते. गोमंतकीय जनता त्यांची रयत होती.
२. बार्देश तालुक्यातील शिल्लक असलेल्या ३ सहस्र हिंदूंना पोर्तुगीज व्हॉईसरॉयने धर्मांतराचा फतवा काढला, तेव्हा महाराजांनी व्हॉईसरॉयला कह्यात घेऊन धर्मांतर रोखले होते.
३. ‘गोव्यात केवळ गोव्यातीलच भूमीपूत्र नेत्यांचे पुतळे उभे राहिले पाहिजे’, असे म्हणणार्यांना परराष्ट्रीय वास्को-द-गामा याचे नाव शहराला दिलेले चालते का ? अजूनही गोव्यातील काही पोर्तुगीजधार्जिण्यांना गोवा हिंदुस्थानचा भाग असल्याचे पचनी पडत नाही. पोर्तुगीजच ‘मूळ गोमंतकीय’ असल्याचा त्यांचा गैरसमज आहे.
४. छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करणारे लोबोही स्वत:ला भारतीय मानत नसून पोर्तुगीजच समजत असावेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याविषयी संशय व्यक्त करण्याआधी ‘फ्रान्सिस झेवियर हे मूळ गोव्याचे कसे ?’, हे सिद्ध करण्याचे जोस लोबो यांना आम्ही आवाहन करतो.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी गोव्यासाठी केलेले कार्य
१. छत्रपती शिवाजी महाराज यांनी गोव्याचा मोठा भाग जिंकला होता.
२. गोव्यातील बेतुल येथील किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनानुसार बांधला गेला आहे.
३. नार्वे, डिचोली येथील प्रसिद्ध श्री सप्तकोटेश्वर मंदिर हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधले होते.
४. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा संसदेतही आहे, मग तो गोव्यात का नको ?
जोस लोबो यांनी तक्रारीत केलेली अभ्यासहीन आणि विद्वेषी वक्तव्ये !
१. म्हापसा येथील नागरिकांना विश्वासात न घेता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सार्वजनिक ठिकाणी उभारण्याला आमचा विरोध आहे. गोव्याबाहेरील व्यक्तीचे असे पुतळे येथे उभारल्याने गोमंतकियांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होणार आहे. (छत्रपती शिवाजी महाराजांनी गोमंतकासाठी केलेले भरीव कार्य सार्या विश्वाला ठाऊक आहे. जोस लोबो यांच्यासारख्या परक्या व्यक्तींनाच खर्या अर्थाने भारतमातेचे सुपुत्र असलेले शिवाजी महाराज यांचे कार्य दिसत नसल्याने ते अशा प्रकारे वक्तव्य करू शकतात ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
२. यामुळे येथील शांती बिघडणार आहे. असा पुतळा उभारण्याऐवजी हे पैसे म्हापसा शहराच्या विकासासाठी वापरावे. (ख्रिस्त्यांच्या फेस्ताचे आणि सेंट झेवियरच्या शवप्रदर्शनाचे किती पैसे आतापर्यंत गोव्याच्या विकासासाठी दिले, हेही लोबो यांनी सांगावे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
३. असे पुतळे सार्वजनिक ठिकाणी न उभारता इच्छुकांनी त्यांच्या खासगी जागी उभारावे. (व्हेनेझुएलासारखा देश छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीतून प्रेरणा घेत असतांना भारतातील एका राज्यात अशा प्रकारची वक्तव्ये होतात, हे दुर्दैव आहे ! लोबो यांनी छत्रपतींच्या नखाएवढे तरी कार्य केले आहे का ? लोबो यांच्यासारख्या टुकार व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर आक्षेप घेणे, हा सूर्यावर थुंकण्याचा प्रकार ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
४. पालिकेने पुतळा उभारण्यास अनुज्ञप्ती दिल्यास चुकीचा पायंडा पडेल आणि इतर संघटनाही त्यांच्या मर्जीनुसार सार्वजनिक ठिकाणी पुतळे उभारतील. त्यामुळे पालिका हतबल होईल.’’ (विखारी आणि विद्वेषी विचारसरणीच्या व्यक्तीच अशा प्रकारे धमक्या देऊन प्रशासनाला अडचणीत आणतात ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात