चीनने कोरोनाविषयीचे सत्य जगापासून लपवले !
साम्यवादी चीनची मानसिकता पाहिल्यावर यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही !
नवी देहली : चीनमधील वृत्तसंकेतस्थळ ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार चीनच्या हुबेई प्रांतात गेल्या वर्षी १७ नोव्हेंबरमध्येच कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण सापडला होता; मात्र याची माहिती २१ दिवसांनंतर, म्हणजे ८ डिसेंबर या दिवशी देण्यात आली. डिसेंबरच्या शेवटी या विषाणूबाधित रुग्णांची संख्या २६६ इतकी झाली होती.
‘जर पहिल्याच दिवशी याविषयीची माहिती देऊन त्यावर उपाययोजना काढण्यात आली असती, तर त्याचा इतका प्रसार झाला नसता आणि मृत्यूंची संख्याही अल्प झाली असती’, असे यात म्हटले आहे. चीनमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे ३ सहस्र २१३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ८० सहस्र ८६० जणांना याची बाधा झाली आहे. जगभरात १ लाख ६९ सहस्र ४८४ जण कोरोनाबाधित आहेत, तर आतापर्यंत कोरोनामुळे जगभरात एकूण ६ सहस्र ५१७ जणांचा मृत्यू झाला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात