- साम्यवाद्यांचा आणि त्यातही चीनच्या साम्यवाद्यांचा इतिहास पहाता चीन सरकारने या व्यावसायिकाची हत्या केली असण्याची शक्यता अधिक आहे. जिनपिंग यांनी यापूर्वीच त्यांच्या अनेक विरोधकांना गायब केले आहे, त्यात आणखी एकाची भर पडली आहे !
- भारतातील साम्यवादीही याच पठडीतील आहेत, हे हिंदुत्वनिष्ठांची हत्या करणार्या केरळमधील साम्यवाद्यांवरून, तसेच माओवादी नक्षलवाद्यांच्या कारवायांवरून लक्षात येते !
बीजिंग (चीन) : चीनमध्ये ‘द कॅनन’ नावाने प्रसिद्ध असणारे व्यावसायिक रेन जिकियंग अचानक बेपत्ता झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यावर कोरोनावरून टीका केली होती. रेन यांनी एका लेखामध्ये जिनपिंग यांचे नाव न घेता त्यांचा ‘शक्तीचा भुकेला’ आणि ‘नग्न विदुषक’ असा उल्लेख केला होता.
रेन यांच्या मित्रांनी त्यांच्या बेपत्ता होण्यामागे चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचा हात असल्याचा आरोप केला होता. रेन हे जिनपिंग सरकारचे प्रमुख टीकाकार होते.
१. रेन यांनी त्यांच्या लेखात म्हटले होते की, चीनचा कम्युनिस्ट पक्ष अभिव्यक्ती स्वातंत्र्य पायदळी तुडवत आहे. यामुळेच कोरोनासारख्या महारोगाचा प्रसार होण्यास साहाय्य होत आहे. या पक्षामुळेच कोरोनावर तत्परतेने उपाययोजना करण्यात आल्या नाहीत.
२. रेन यांच्या मित्रांनी सांगितले की, वर्ष २०१६ पासून त्यांच्यावर सरकार लक्ष ठेवून होते. त्यांची सामाजिक माध्यमांवरील सर्व खातीही बंद करण्यास त्यांना बाध्य करण्यात आले होते. त्यांच्या बेपत्ता होण्यावर पोलिसांनीही मौन बाळगले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात