कोरोनामुळे हिंदु संस्कृतीचे महत्त्व जगाला पटत आहे, त्याचे आणखी एक उदाहरण !
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेतील ‘हार्वर्ड मेडिकल स्कूल’ने ‘कोरोनाशी लढण्यासाठी योग आणि ध्यान साहाय्यभूत आहे’, असे म्हटले आहे. याशिवाय ‘श्वासावर नियंत्रण ठेवले पाहिजे’, असेही त्यांनी सांगितले. ‘हार्वर्ड मेडिकल स्कूल’ने कोरोनावर नव्याने एक आरोग्य मार्गदर्शिका काढली असून त्यात हा सल्ला दिला आहे.
अमेरिकेत हिंदु संघटनांकडून हवन आणि प्रार्थना
‘विश्व हिंदू काँग्रेस अमेरिका’ या संघटनेने म्हटले आहे की, कोरोनापासून बचाव करण्यासाठी उत्तर अमेरिकेमध्ये हवन आणि प्रार्थना आयोजित करण्यात आल्या आहेत. याचे आयोजक अनिल शर्मा म्हणाले की, सध्या जो ताण निर्माण झाला आहे, तो आसन, ध्यान आणि प्राणायाम यांमुळे न्यून करता येऊ शकतो.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात