भिवंडी : वैजोले गाव, तसेच कामतघर येथील स्वामी अय्यप्पा मंदिर भागात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात येणार्या स्वरक्षण प्रशिक्षणवर्गातील धर्माभिमान्यांनी तिथीनुसार शिवजयंती उत्सव साजरा केला.
दीपप्रज्वलन करून आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन अन् औक्षण करून कार्यक्रमाचा आरंभ करण्यात आला. या वेळी स्वरक्षणविषयक प्रात्यक्षिकांचा सराव करण्यात आला.
कु. प्रणिता भोर यांनी शिवजयंतीविषयी माहिती दिली. यासह प्रत्येकाने शौर्य जागृत होईल असा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी एक प्रसंग सांगितला. या वेळी हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा करण्यात आली.
वैशिष्ट्यपूर्ण
१. कार्यक्रमाची सर्व सिद्धता धर्मप्रेमींनी केली. सिद्धता करतांना धर्मप्रेमींनी उत्स्फूर्तपणे ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’ ‘जय श्रीराम’, ‘जय भवानी जय शिवाजी’, अशा घोषणा दिल्या.
२. धर्मप्रेमींनी यापुढेही क्रांतीकारक आणि शूर पराक्रमी राजे यांच्या पराक्रमाची आठवण करून देणारे उपक्रम करण्याचे ठरवले.