मुझफ्फरपूर (बिहार) : ज्या प्रकारे अधिवक्ता सरदार वल्लभभाई पटेल, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर आदींनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडली, तसेच अधिवक्त्यांनी राज्यघटनेतील कलम ३६८ च्या आधारे घटनात्मकरित्या भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी योगदान दिले पाहिजे. त्यासाठी साधनेच्या बळावर हिंदु राष्ट्राची स्थापना करणे शक्य आहे, असे आवाहन हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी अधिवक्त्यांच्या बैठकीत केले. येथील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता अभिषेक कुमार यांनी मार्चच्या पहिल्या आठवड्यात या बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ यांनी साधनेचे महत्त्व आणि नामजपाद्वारे होणारे परिवर्तन याविषयी मार्गदर्शन केले.
अधिवक्ता सांगोलकर पुढे म्हणाले की,
१. मुझफ्फरपूर शहरामधील अस्वच्छता दूर करण्यासाठी नगरपालिकेकडे तक्रार करणे, न्यायालय, शिक्षण आणि प्रशासन येथील भ्रष्टाचार लक्षात आल्यावर त्याला कायदेशीरित्या विरोध करणे, हे अधिवक्त्यांचे दायित्व आहे.
२. भारतात एफ्.एस.एस.ए.आय. आणि एफ्.डी.ए. असतांनाही जमियत-उलेमा-हिंद, हलाल कौन्सिल ऑफ इंडिया यांसारख्या खासगी संस्था खाद्यपदार्थ अन् श्रृंगार यांचे साहित्य आदी पदार्थांना हलालच्या नावाखाली हलाल प्रमाणित करण्यासाठी २१ सहस्र ५०० रुपये घेत आहे. यामुळे गेल्या ७ वर्षांच्या हलाल अर्थव्यवस्था सहस्रावधी कोटी रुपयांची झाली आहे. या प्रकारे समांतर अर्थव्यवस्थेद्वारे आर्थिक जिहाद चालू आहे.
क्षणचित्र : उपस्थित सर्व अधिवक्त्यांनी प्रत्येक मासाच्या पहिल्या शनिवारी मासिक बैठक आयोजित करण्याचा निश्चय केला.