‘आता स्वतःला कोणत्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून कोरोनाचा संसर्ग झाला आहे’, हे इस्लामी धर्मगुरूंनी सांगावे ! ‘जगभर थैमान घालणार्या जिहादी आतंकवादाला इस्लामी धर्मगुरु खतपाणी घालतात. त्याचीच शिक्षा त्यांना मिळाली आहे’, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?
बगदाद : चीनच्या अत्याचारी सरकारने १० लाखांहून अधिक मुसलमानांना नजरकैदेत ठेवले होते. त्यामुळे या चिनी लोकांना शिक्षा देण्यासाठी अल्लाने हा (कोरोना) विषाणू पाठवला आहे. चिनी नागरिक ज्या नकाबची (बुरख्याची) मस्करी करत होते, आज तेच त्यांना घालावे लागत आहे, असे विधान इराकमधील शिया नेते आणि मुसलमान धर्मगुरु हादी अल मोदारीस यांनी केले होते. हादी अल मोदारीस यांच्या विधानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला. आता हादी अल मोदारीस यांनाच कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे सामाजिक माध्यमांवर अनेकांनी ‘हादी अल मोदारीस यांना अल्लाने काय म्हणून ही शिक्षा दिली ?’, असा प्रश्न विचारला आहे. सध्या इराकमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर झाला असून तेथे ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात