असा प्रकार एखाद्या मंदिरात घडला असता, तर एकजात पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी मंदिरातील पुजार्यांवर तुटून पडले असते आणि हिंदूंच्या धार्मिक परंपरांना ‘अंधश्रद्धा’ ठरवत यावर कारवाई करण्याची मागणी केली असती !
सेऊल (दक्षिण कोरिया) : दक्षिण कोरियामधील एका चर्चमध्ये कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी देण्यात आलेल्या ‘पवित्र पाण्या’मुळे ४६ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. या वृत्ताला स्थानिक सरकारी अधिकार्यांनी दुजोरा दिला आहे. गेईयॉनगी प्रांतामधील ‘रिव्हर ऑफ ग्रेस कम्युनिटी चर्च’मध्ये हा प्रकार घडला. या घटनेनंतर चर्च बंद करण्यात आले आहे. दक्षिण कोरियामध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या ८ सहस्र २३६ वर पोचली आहे.
१ ते ८ मार्च या कालावधीत या चर्चमध्ये झालेल्या प्रार्थनेनंतर चर्चमधील एका महिला कर्मचार्याने एका बाटलीमधून ‘नोझल’ (नळीसारखा ड्रॉपर) भाविकांच्या तोंडामध्ये टाकत त्यांना ‘पवित्र पाणी’ दिले. यामुळेच ४६ जणांना कोरोनाची लागण झाली. यात चर्चचे मुख्य धर्मोपदेशक आणि त्यांची पत्नी यांचाही समावेश आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात