Menu Close

डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाला ‘चिनी व्हायरस’ संबोधल्याने चीनकडून अमेरिकेच्या वृत्तपत्रांवर बंदी

  • कोरोनाला ‘चिनी’ संबोधल्याने चीन अशा प्रकारची भूमिका घेते; मात्र विदेशी आणि त्यातही अमेरिकी प्रसारमाध्यमे सतत भारताच्या विरोधात लिखाण प्रसारित करत असतांना भारत असे पाऊल उचलत नाही, हे संतापजनक !
  • चीनची कृती वृत्तपत्र स्वातंत्र्यावर घाला घालणारी आहे, असे म्हणण्याचे धारिष्ट्य भारतातील तथाकथित पुरो(अधो)गामी आणि साम्यवादी करतील का ?

बीजिंग : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका ट्वीटमध्ये ‘चिनी व्हायरस’मुळे (कोरोना विषाणूमुळे) प्रभावित झालेली विमान आस्थापने आणि अन्य उद्योग यांना अमेरिका जोरदार समर्थन देईल. आम्ही पूर्वीपेक्षा सामर्थ्यवान होऊ !’, असे म्हटले होते. त्यावर चीनच्या विदेश मंत्रालयाने ट्रम्प यांच्या विधानाचा निषेध करत अशा प्रकारची विधाने न करण्याची चेतावणी दिली आहे. याचसमवेत चीनने ‘द न्यूयॉर्क टाइम्स’, ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ आणि ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ या अमेरिकेच्या ३ आघाडीच्या वृत्तपत्रांवर बंदी घातली आहे. तसेच चीनने या तिन्ही अमेरिकी वृत्तपत्रांच्या पत्रकारांना देशातून हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये विदेशी माध्यमांवर चीनकडून झालेली ही सर्वांत कठोर कारवाई आहे.

अमेरिकेने चिनी माध्यमांच्या विरोधात केलेल्या कारवाईमुळे ‘आम्ही त्यांच्या माध्यमांवर कारवाई केली’, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे, तर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पियो यांनी ‘चीनने केलेल्या या कारवाईवर विचार करावा’, असे  आवाहन केले आहे. या वेळी चीनकडून असाही दावा करण्यात आला आहे की, ट्रम्प प्रशासनाने चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांशी संबंधित निवडक चिनी पत्रकारांनाच देशात रहाण्याची अनुमती दिली आहे. त्यामुळे आम्ही प्रत्युत्तर म्हणून हा निर्णय घेतला आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *