- पाकने गेली ७२ वर्षे केवळ जिहाद करण्यात आणि आतंकवादी निर्माण करण्यात स्वतःचा वेळ अन् पैसा खर्च केला. आतंकवाद पोसून लोकांना मारण्याचाच प्रयत्न करणार्या पाककडे माणसांना जगवण्याची क्षमता कशी निर्माण होणार ?
- भारताचे खाऊन ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणार्यांना पाकची ही स्थिती आतातरी लक्षात येऊन भारताचे महत्त्व कळणार आहे का ? जर कळणार नसेल, तर अशांना पाकमध्येच पाठवले पाहिजे, असे देशभक्तांना वाटते !
नवी देहली : कोरोनाशी लढण्यासाठी आमच्याकडे पुरेशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाहीत आणि क्षमताही नाही, ही चिंतेची गोष्ट आहे. अशी स्थिती पाकमध्येच नाही, तर भारत, दक्षिण आशिया आणि आफ्रिका खंडातील देशांमध्येही आहे, असे वक्तव्य पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एका मुलाखतीत केल्याचा व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला आहे. (पाकसारखी स्थिती भारतात नाही, हे इम्रान खान यांनी लक्षात ठेवले पाहिजे. भारतीय यंत्रणा सक्षमपणे कामाला लागल्यामुळे भारतात कोरोनाचा फैलाव झाला नाही. याविषयी जागतिक आरोग्य संघटनेनेही त्याचे कौतुक केले आहे. कोरोनाच्या सूत्रावरूनही भारतावर टीका करू पहाणारे पाकचे पंतप्रधान भारतद्वेषीच होत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) पाकिस्तानमध्ये गेल्या २ दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३४ वरून २३६ इतकी झाली आहे, तर एकाचा मृत्यू झाला आहे.
इम्रान खान यांनी पुढे म्हटले आहे की, आर्थिक मंदीमुळे मी गरिबी आणि भूकबळी यांविषयी चिंतित आहे. कोरोनामुळे या चिंतेत वाढ झाली आहे. जगाने याकडे लक्ष दिले पाहिजे. पाकसारख्या देशांना साहाय्य केले पाहिजे. आमच्या कर्जामध्ये सवलत मिळाली पाहिजे. असे केल्यास आम्ही कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी लढण्यासाठी काहीतरी करू शकू. (जग सातत्याने पाकला आतंकवाद नष्ट करण्याचे आवाहन करत होता; मात्र पाकने त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले. अमेरिकेने अनेक वर्षे अब्जावधी रुपयांचे साहाय्य पाकला केले; मात्र त्याचा वापर सैन्यशक्ती वाढवणे आणि आतंकवादी निर्माण करणे यांसाठीच करण्यात आला. आता पाक जगाकडे भीक मागत आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
पाकमध्ये विलगीकरण केंद्राची भयावह स्थिती !
पाकमधील कोरोनाबाधित रुग्णांना ठेवण्यात आलेल्या विलगीकरण केंद्राची (कोरोनाची बाधा झालेल्यांना ठेवण्याचे केंद्र) भयानक स्थिती दर्शवणारे व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले आहेत.
तौसिफ हैदर नावाच्या व्यक्तीने सामाजिक माध्यमात पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये या केंद्राची स्थिती लक्षात येत आहे. हे केंद्र तंबू ठोकून उभारण्यात आले आहेत. एका केंद्रामध्ये २०० हून अधिक जणांना ठेवण्यात आले आहे. त्यांना भूमीवर झोपावे लागत आहे. येथे त्यांना मास्कही देण्यात आलेले नाही. तसेच येथे डॉक्टरही दिसत नाहीत. ‘हे सर्वजण शिया असल्याने सरकारने त्यांना मरण्यासाठी सोडून दिले आहे’, असे आरोप केले जात आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात