देहली दंगलीतील धर्मांधांची बाजू घेणार्या प्रसारमाध्यमांना उघडे पाडण्याचा प्रयत्न केल्याचा परिणाम
गूगल, फेसबूक, ट्विटर आदी विदेशी आस्थापने असणारी सामाजिक माध्यमे हिंदूंचा आणि हिंदुत्वाचा द्वेष करून धर्मांधांना सातत्याने पाठीशी घालत असतात, हे वेळोवेळी दिसून आले आहे. अशांवर कधी अशी बंदी घातली गेली आहे का ?
नवी देहली : राष्ट्रवादी विचारसरणीच्या ‘ऑपइंडिया हिंदी’ या वृत्तसंकेतस्थळाचे ट्विटर अकाऊंट ट्विटर आस्थापनाकडून १२ घंट्यांसाठी बंद करण्यात आले होते. देहलीतील दंगलीच्या प्रकरणी धर्मांधांची बाजू घेणार्या तथाकथित पुरोगामी आणि निधर्मीवादी प्रसारमाध्यमांच्या विरोधात ‘ऑपइंडिया हिंदी’ने मोहीम उघडल्याने ट्विटरकडून ही बंदी घालण्यात आल्याचा आरोप ‘ऑपइंडिया हिंदी’कडून करण्यात आला आहे.
१. ‘ऑपइंडिया-हिंदी’ने देहलीतील दंगलीच्या काही दिवसांपूर्वी धर्मांधांच्या जमावाने आखलेल्या योजनेची माहिती उघड केली होती. तसेच या दंगलीविषयी तथाकथित धर्मनिरपेक्ष प्रसारमाध्यांनी ‘धर्मांध हे गुन्हेगार नसून ते बळी ठरत आहेत’, असा खोटा प्रसार केला होता. याच्याविरोधात संपूर्ण चौकशी करून या प्रसारमाध्यमांचा चाललेला खोटा प्रसार ‘ऑपइंडिया हिंदी’ने उघड केला होता.
२. या खात्यावर १२ घंट्यांसाठी बंदी घातल्यानंतर ट्विटरने स्पष्टीकरण देऊन दावा केला, ‘या खात्याने हिंसाचाराला चालना दिली आहे किंवा वंश, जाती, राष्ट्रीय भावना इत्यादींच्या आधारे इतर लोकांना धमकी दिली आहे.’ ‘ऑपइंडिया हिंदी’ने जो दावा केला, त्याविषयी मात्र काहीच स्पष्टीकरण दिले नाही. इतकेच नाही, तर पत्रकार सबा नकवी यांच्या जातीय ट्वीटला ‘ऑपइंडिया हिंदी’चे संपादक अजित भारती यांनी समर्पक उत्तर दिले म्हणून त्यांचे वैयक्तिक खातेही १२ घंट्यांसाठी बंद केले.
३. हिंदुत्वनिष्ठ विचारवंतांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केल्यावरून सामाजिक संकेतस्थळ वापरकर्ते या बंदीवरून ट्विटरला प्रश्न विचारत होते.
४. गेल्या वर्षी कलम ३७० रहित केल्यामुळे काश्मिरी हिंदू अप्रसन्न असल्याचे वृत्त दाखवणार्या ‘एन्.डी.टी.व्ही.’ या वृत्तवाहिनीचा हा खोटारडेपणा उघड करणारे काश्मिरी हिंदु रोहित काचरू यांचे ट्विटर खातेही बंद करण्यात आले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात