- भारतात आतंकवादी कारवायांच्या मागे पाकचा हात असतो. आता त्याही पुढे जाऊन भारतात दंगली घडवण्यासाठीही पाक कार्यरत असल्याचे समोर येत आहे. एवढे सगळे पुरावे असतांनाही पाकला अद्दल घडवण्यासाठी भारत सरकार धडक कृती का करत नाही ?
- इस्लामी देश आणि त्यांच्या संघटना आता या दंगलीसाठी पाकला जाब विचारणार आहेत का ? देशातील निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी याविषयी काही बोलणार आहेत का ?
नवी देहली : पाकची राजधानी इस्लामाबाद, तसेच कराची, रावळपिंडी आणि लाहोर या शहरांतील २०० हून अधिक ट्विटर खात्यांवरून देहलीतील धर्मांधांना दंगलीच्या वेळी पोलिसांच्या विरोधात भडकावणारे ट्वीट प्रसारित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या ट्वीट्सद्वारे ‘देहलीमध्ये पोलिसांनी मुसलमानांना लक्ष्य केले’, असे दाखवण्याचाही प्रयत्न करण्यात आला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात