पाटलीपुत्र (बिहार) : मंदिर सरकारीकरणाच्या नावाखाली मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिर, शिर्डीचे श्री साईबाबा मंदिर आदी मंदिरांमध्ये भक्तांनी अर्पण केलेल्या धनाचा दुरुपयोग केला गेला आहे. यासाठी मंदिरांचे व्यवस्थापन हिंदु भक्तांच्या हातात दिले पाहिजे. मंदिरांचे सरकारीकरण रहित केले पाहिजे, यासाठी हिंदु विधीज्ञ परिषद कार्यरत आहे, असे प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी येथे माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. रमेश चौबे यांच्या घरी मार्च मासाच्या पहिल्या सप्ताहात अधिवक्त्यांच्या बैठकीत केले. या वेळी अधिवक्ता सांगोलकर यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेमध्ये अधिवक्ते कशा प्रकारे त्यांचे योगदान करू शकतात, याविषयी मार्गदर्शन केले.
अधिवक्ता सांगोलकर पुढे म्हणाले की, रोहिंग्या मुसलमानांना नागरिकत्व मिळावे, यासाठी मुंबईतील आझाद मैदानामध्ये रझा अकादमीकडून आयोजित केलेल्या मोर्च्याच्या वेळी हिंसाचार करण्यात आला. हिंदु विधीज्ञ परिषदेने हानीच्या भरपाईसाठी न्यायालयीन लढा देऊन रझा अकादमीकडून ४ कोटी रुपये सरकारला देण्यास भाग पाडले.
या वेळी हिंदु विधीज्ञ परिषदेच्या यशस्वी कार्याविषयीची ध्वनीचित्र चकती दाखवण्यात आली.