-
हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने आयोजित वाहनफेरीत हिंदु धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त सहभाग !
-
१४० हून अधिक वाहनांचा सहभाग
तासगाव : हिंदूविरोधी कायदे, गोहत्या, धर्मांतर, आतंकवाद, बलात्कार, नक्षलवाद, काश्मीरमध्ये इसिसचे झेंडे फडकावणार्यांची वाढती संख्या, लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद यांसारख्या समस्या वाढत आहेत. याचप्रकारे विविध प्रकारच्या हिंदूविरोधी षड्यंत्रांविरुद्ध हिंदूंनी जात, संप्रदाय, संघटना आदींचे बंध तोडून एकमुखाने आवाज उठवण्याची हीच वेळ आहे. त्यासाठी हिंदूंनी बुधवार, १३ एप्रिल या दिवशी चंपाबेन वाडीलालच्या ज्ञानमंदिराच्या मैदानावर होत असलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रतिभा तावरे यांनी केले. हिंदु धर्मजागृती प्रचारासाठी सांगली नाका ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अशी वाहनफेरी काढण्यात आली, त्या वेळी त्या बोलत होत्या. या फेरीत १२५ हून अधिक दुचाकी आणि १५ हून अधिक चारचाकी वाहने सहभागी झाली होती.
या फेरीत देण्यात आलेल्या गोमातेचा विजय असो, जय श्रीराम, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, हिंदु एकतेचा विजय असो, अशा घोषणांनी तासगाव शहर दुमदुमले. फेरीच्या प्रारंभी सनातन संस्थेचे साधक श्री. महादेव जाधव यांच्या हस्ते धर्मध्वजाचे पूजन करण्यात आले. या वेळी तासगाव, कवठेमहांकाळ, चिंचणी, कुमठे येथील हिंदु धर्मामिभानी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या फेरीत भाजप, शिवसेना, श्रीशिवप्रतिष्ठान, बजरंग दल, जुळेवाडी, वरची गल्ली, तासगाव येथील हिंदू, हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांसह ३०० हून अधिक हिंदु धर्माभिमानी सहभागी झाले होते. समारोपाच्या प्रसंगी ज्येष्ठ समर्थभक्त पू. मकरंदबुवा रामदासी आणि श्रीशिवप्रतिष्ठानचे श्रीकृष्ण माळी यांनी मनोगत व्यक्त केले.
क्षणचित्रे
१. फेरी चालू होण्यापूर्वी दोन गोमाता फेरीच्या ठिकाणी उपस्थित होत्या.
२. कवठेमहांकाळ येथील जगदंब प्रतिष्ठान आणि चिंचणी येथील अविरत गणेश उत्सव मंडळाचे कार्यकर्ते स्वत:च्या पारंपरिक ढोल-ताशासह फेेरीमध्ये सहभागी झाले. शहरातील चौकाचौकात त्यांनी वाजवलेल्या ढोल-ताशांमुळे शहरात चैतन्य निर्माण झाले.
३. महिलांसह अनेक धर्मामिभानी हिंदूंनी भगवे फेटे परिधान केले होते, यामुळे शहर भगवेमय झाले होते.
४. पलूस येथील श्रीशिवप्रतिष्ठानचे १३ वर्षांचे कु. सत्यजित आणि कु. सर्वजित पाटील यांनी फेरीमध्ये लाठीकाठीची प्रात्यक्षिके दाखवून उपस्थितांची मने जिंकली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात