Menu Close

पाकिस्तानमधील कोरोनाग्रस्त रुग्णांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये करत आहे स्थलांतरित

  • पाकचे खरे स्वरूप ! यावर आंतरराष्ट्रीय मानवाधिकारवाले, धार्मिक आयोग, भारतातील पाकप्रेमी पाकला खडे बोल सुनावणार कि गप्प बसणार ?
  • जो देश स्वतःच्या नागरिकांना बरे करण्याऐवजी अन्यत्र हलवून त्यांना मरणाच्या दाढेत सोडत आहे. यातून त्याची क्रूरताच दिसून येते !

नवी देहली : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील कोरोनाग्रस्त ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांना पाकच्या सैन्याकडून पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बल्टिस्तान या भागात स्थलांतरित करण्यात येत आहे. कोरोनाचा संसर्ग होण्याच्या भीतीमुळे स्थानिक नागरिकांकडून जोरदार विरोध करण्यात येत आहे. गिलगिट-बल्टिस्तान येथील नागरिक कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष (क्वारंटाइन सेंटर) उभारायलाही विरोध करत आहेत; कारण त्या भागात पायाभूत सोयी-सुविधा नाहीत, तसेच प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचार्‍यांचीही कमतरता आहे.

पाकच्या सैन्याकडून असे आदेश देण्यात आले आहेत की, पाकला पंजाब प्रांतामध्ये साफसफाई करायची आहे. तसेच सैनिकी तळ आणि सैनिकी कुटुंब रहात असलेल्या भागांमध्ये एकही कोरोनाग्रस्त रुग्ण नको. त्यामुळे त्या रुग्णांना स्थलांतरित करण्यात येत आहे.

पाकिस्तानमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये बहुतांश तरुण

पाकिस्तानमधील १ सहस्र १२३ रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण हे २१ ते ३० वर्षे वयोगटातील आहेत, अशी माहिती पाक पंतप्रधानांचे विशेष सहाय्यक डॉ. झफर मिर्झा यांनी दिली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *