पाकमध्ये कोरोनाविषयीच्या साहाय्यतेमध्ये हिंदूंशी भेदभाव
- भारतातील पाकप्रेमी पाकच्या या अमानवीय भेदभावाविषयी तोंड उघडणार का ? कि ‘हा पाकचा अंतर्गत प्रश्न आहे’, असे सांगून त्याचे समर्थन करणार आहेत ?
- पाकमधील लाखो हिंदूंचे रक्षण करण्यासाठी भारताने आता पाकमध्ये घुसणे आवश्यक आहे अन्यथा रक्षण करण्यासाठी पाकमध्ये एकही हिंदु शिल्लक रहाणार नाही !
- ‘भारत हिंदु राष्ट्र झाल्यावर अल्पसंख्यांकांचे काय होणार ?’ असा प्रश्न विचारणारे ‘पाकिस्तानसारख्या इस्लामी राष्ट्रात गेल्या ७२ वर्षांपासून अल्पसंख्यांक हिंदूंचे काय होत आहे ?’, असा प्रश्न कधीच का विचारत नाहीत ?
इस्लामाबाद (पाकिस्तान) : पाकमध्ये १ सहस्र ५६० जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. पाक सरकारकडून कोरोनाग्रस्तांना साहाय्य करण्यात येत असले, तरी त्यातही धर्मानुसार भेदभाव केला जात असल्याचे दिसून येत आहे. पाकच्या सिंध प्रांतामध्ये रहाणार्या अल्पसंख्यांक हिंदूंना कोणतेही साहाय्य करण्यात येत नसल्याचे समोर आले आहे.
पाकने ‘यू.एन्.एच्.सी.आर्.’कडे स्पष्टीकरण द्यावे ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी
‘उपासमारीमुळे पाकच्या सिंध प्रांतातील हिंदूंना त्यांचे प्राण गमवावे लागत असल्याचा एक ‘व्हिडिओ’ प्रसारित झाला असून त्याविषयी पाकने ‘युनायटेड नेशन्स हाय कमीशनर फॉर रेफ्युजीस’ (यू.एन्.एच्.सी.आर्.) या संस्थेकडे स्पष्टीकरण द्यावे. जर ‘व्हिडिओ’ बनावट असेल, तर तसेही पाकने सांगावे’, असे ‘ट्वीट’ राज्यसभेतील खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केले.
भारताने राजस्थानमार्गे हिंदूंना साहाय्य करावे ! – पाकमधील राजकीय कार्यकर्ते डॉ. अमजद अयूब मिर्झा
पाकमधील राजकीय कार्यकर्ते डॉ. अमजद अयूब मिर्झा म्हणाले, ‘‘कराची शहर आणि सिंध प्रांत येथील वेगवेगळ्या भागांमध्ये रहाणार्या हिंदूंवर सध्या संकट आले आहे. भारत सरकारने त्यांना साहाय्य करावे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान मार्गे हिंदूंपर्यंत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करावा.’’
१. सिंधमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाकडून कराचीमधील लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात आहे; मात्र हिंदूंना हा पुरवठा केला जात नाही. याविषयी हिंदूंनी प्रश्न विचारल्यावर त्यांना ‘या वस्तू हिंदूंसाठी नाहीत, तर केवळ मुसलमानांसाठी आहेत’, असे सांगितले जात आहे. सिंध प्रांतात ५ लाख हिंदू असून ते या लाभापासून वंचित आहेत.
२. सिंधमध्ये सरकारकडून दळणवळण बंदी करण्यात आली आहे. या काळात कामगारांना अन्नधान्य वाटण्याचे काम जिल्हा प्रशासन आणि खासगी संस्था करत आहेत; मात्र या कामगारांची कोरोनाविषयीची पडताळणी करण्याची कोणतीही व्यवस्था नाही, असेही सांगितले जात आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात