लाखो लोकांच्या जीविताला धोका निर्माण करणार्या काही मूठभर लोकांच्या उपद्रवाला आळा घालण्यासाठी एखाद्या राज्यकर्त्याला कशा प्रकारे कठोर व्हावे लागते, त्याचेच हे उदाहरण म्हणावे लागेल !
मनिला (फिलिपिन्स) : दळणवळण बंदीचा आदेश कुणी मोडत असेल किंवा कुणी अडथळे निर्माण करत असेल, तर त्याला तात्काळ गोळ्या घाला, असा स्पष्ट आदेश फिलिपिन्सचे राष्ट्रपती रॉड्रिगो दुतेर्ते यांनी पोलीस आणि सुरक्षादल यांना दिला. फिलिपिन्समध्ये सध्या २ सहस्र ३११ जणांना कोरोनाची लागण झाली असून आतापर्यंत एकूण ९६ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा आणखी संसर्ग होऊ नये, यासाठी देशात दळणवळण बंदी करण्यात आली आहे. दुतेर्ते यांनी यापूर्वी अमली पदार्थांची तस्करी करणार्यांनाही गोळ्या घालण्याचा आदेश दिला होता.
दुतेर्ते यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात सांगितले, ‘‘आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि डॉक्टर यांना कोणत्याही प्रकारची दुखापत होता कामा नये. त्यांना मारहाण करणे, हा गंभीर गुन्हा आहे. नियम मोडू पहाणार्यांनी सरकारला आव्हान देऊ नये.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात