Menu Close

‘तबलीगी जमात’सारख्या संघटनांवर कठोर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

दळणवळण बंदीचा आदेश मोडून ‘कोरोना’ पसरवण्यास साहाय्य करणार्‍यांवरही कारवाईची मागणी

मुंबई : भारतात कोरोनाची महामारी पसरू नये; म्हणून केंद्रशासनाने दळणवळण बंदीसह विविध उपाययोजना करत देशभरातील सर्व धार्मिक स्थळेही बंद केली आहेत. असे असतांना आजही शासकीय आदेश पायदळी तुडवत देशभरातील अनेक मशिदींसह विविध ठिकाणी मोठ्या संख्येने एकत्र जमून नमाजपठण केले जात आहे. या घटना सामाजिक माध्यमे आणि वृत्तवाहिन्यांवरील वृत्ते यांद्वारे उघड होत आहेत. आतातर देहलीतील तबलीगी जमातच्या कार्यक्रमामुळे देशभरातील अनेक राज्यांत कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाल्याचे समोर आले आहे. मुसलमान समाजातील काही समाजविघातक प्रवृत्ती या आदेशांना धुडकावत समाजाच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण करत आहेत. अशा प्रवृत्तींवर, तसेच तेथील मौलवी आणि तबलीगी जमात यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

या प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की,

१. कोरोनामुळे जागतिक पातळीवर ९ लाख ४० सहस्रांहून अधिक लोक संक्रमित, तर ४७ सहस्रांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

२. केंद्रशासन कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न करत असतांना मुसलमानांकडून ‘टिकटॉक’सारख्या अ‍ॅपवर ‘मास्क’ न लावण्याचे, ‘सोशल डिस्टन्सिंग’चे (एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखण्याचे) पालन करू नये, असे ‘व्हिडिओ’ प्रसारित केले जात आहेत.

३. एवढ्यावरच न थांबता तबलीगी जमातच्या देहली येथील कार्यक्रमात सहभागी झालेले अनेक जण हे ‘पर्यटक व्हिसा’ घेऊन भारतात आल्याचे आणि बेकायदेशीरपणे धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्याचे उघड झाले आहे. दुसरीकडे कोरोनाचा संसर्ग पसरू नये, यासाठी हिंदूंनी शासनाच्या आदेशांचे पालन करत मंदिरे बंद ठेवत समाजभान राखले.

४. एकीकडे ‘सोशल डिस्टन्सिंग’ होत नसल्याने आणि जमावबंदीच्या आदेशांचे पालन न करणार्‍या लोकांना पोलीस लाठ्यांचा मार देत आहेत. जे कायद्याचे पालन करत नाहीत, त्यांच्यावर कारवाई करायलाच हवी; मात्र मुसलमानांकडून याचे पालन होत नसल्याविषयी त्यांच्यावर कुठलीही कठोर कारवाई झाल्याचे दिसत नाही, हे दुर्दैव आहे.

५. अनेक मशिदींमध्ये विदेशी मुसलमान येऊन बेकायदेशीरपणे वास्तव्य करत आहेत. त्यांना धार्मिक कार्यक्रमांत सहभाग घेण्याची अनुमती नसतांना त्यात ते सहभाग घेत आहेत. या गोष्टी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत घातक आहेत.

६. आता कोरोनाग्रस्त असलेले मुसलमान रुग्ण आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टर यांच्यावर थुंकत असल्याची, तसेच त्यांची तपासणी करण्यास गेलेल्या वैद्यकीय अधिकारी आणि पोलीस यांच्यावर आक्रमणे करत असल्याची वृत्ते येत आहेत. ही मानसिकता अत्यंत घातक आहे.

७. समाजामध्ये कोरोना हेतूतः पसरवण्याची कृती हा गंभीर गुन्हाच आहे. अशा समाजकंटकांना तात्काळ अटक करायला हवी. एरव्ही पुरोगामित्वाच्या नावावर टेंभा मिरवणारे, तसेच मुसलमान समाजातील नेते मंडळी यावर अद्याप मूग गिळून गप्प आहेत.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *