केंद्रात सत्तेत येऊन २ वर्षे होत आली असतांना हिंदूंना नागरिकत्व का दिले नाही, याचे उत्तर गृहमंत्र्यांनी दिले पाहिजे !
नवी देहली : आसामध्ये जर भाजपचे शासन आले, तर बांगलादेशातून आलेले अल्पसंख्यांक हिंदू, बौद्ध आणि शीख आदी शरणार्थींना ३ मासांच्या आत नागरिकत्व देण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी होजई विधानसभा क्षेत्रातील एका प्रचारसभेत दिले. ग
सिंह पुढे म्हणाले, शरणार्थींच्या शिबिरामध्ये रहात असलेल्या अल्पसंख्यांकांच्या दुर्दशेसाठी केंद्राची अधिसूचना लागू न करणारे आसामचे शासन उत्तरदायी असून ते बांगलादेशी अल्पसंख्यांकांवर अन्याय करत आहेत. या अधिसूचनेमध्ये पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगानिस्तान येथील हिंदू, बौद्ध, शीख आदी शरणार्थींना दीर्घकालीन व्हिसा देण्याच्या सवलतीसह नागरिकत्व देण्याचीही तरतूद आहे. (जर शासन आले नाही, तर हिंदूना कुणीच वाली नसणार का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात