Menu Close

देशभरात धर्मांधांकडून होत असलेल्या ‘कोरोना’ संक्रमणाच्या घटनेला धरून टि्वटरवर ट्रेंड झाला ‘#Corona_Jihad’

राष्ट्रीय ‘ट्रेंड’मध्ये द्वितीय स्थानी

मुंबई : देहलीमध्ये तबलीगी जमातकडून आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेले सदस्य देशभरात परतल्यामुळे कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. या सदस्यांना मरकज मशिदीतून रुग्णालयात नेण्यात येत असतांना ते रस्त्यावर थुंकत होते. तसेच दळणवळण बंदीच्या वेळीही धर्मांध विविध ठिकाणी मशिदींमध्ये, घराच्या छतावर नमाजपठण करत आहेत. त्यांना रोखणार्‍या पोलिसांवर आक्रमणही करत आहेत. या पार्श्‍वभूमीवर टि्वटरवर ‘#Corona_Jihad’ हा ‘हॅशटॅग’ (टि्वटरवर चर्चित विषय) ‘ट्रेंड’ (एकाच वेळी अनेक जण एका विषयाची चर्चा करतात त्याला ‘ट्रेंड’ म्हणतात) झालेला दिसून आला. हा हॅशटॅग द्वितीय स्थानी होता. ‘यामध्ये ‘कोरोना जिहाद’ म्हणजे ‘देशात संक्रमण पसरवण्याचे षड्यंत्र’ आहे का ?’, असा प्रश्‍नही राष्ट्रप्रेमी नागरिकांनी ‘ट्रेंड’मध्ये उपस्थित केला. त्यासमवेतच तबलीगी जमातसारख्या संघटनांवर कार्यवाही करण्याची मागणीही या ‘ट्रेंड’मध्ये केली गेली. या ट्रेंडमध्ये १५ सहस्रांहून अधिक ट्वीट्स करण्यात आल्या.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *