संपादकीय
आज जगात जे काही थोडे-अधिक बरे चालले आहे, ते शिक्षेच्या धाकामुळे ! जर शिक्षेचा धाक नसेल, तर मनुष्याच्या अनिर्बंध वागण्याला आळा कसा बसेल ? कोरोनाच्या निमित्ताने या वस्तूस्थितीची प्रकर्षाने जाणीव होत आहे. कोरोना अधिक प्रमाणात पसरू नये; म्हणून केंद्र सरकारने दळणवळण बंदी घोषित केली, तसेच गर्दी टाळण्याचे आवाहन केले. तरीही अनेक जण हे नियम मोडतांना दिसून येतात. यामध्ये ‘त्याला काय होते’, या वृत्तीचे लोक आहेत, तसेच अतिरेकी पंथवेडाने पछाडलेले लोकही आहेत. लोक स्वयंशिस्त पाळत नाहीत; म्हणून कायदे करण्याची वेळ येते; पण जेव्हा शिक्षेचाही धाक रहात नाही, तेव्हा मात्र परिस्थिती हाताबाहेर जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दळणवळण बंदी लागू असतांनाही अनावश्यकरित्या दुचाकी वाहनांवर फिरणारे लोक असोत अथवा भाजीमंडईमध्ये गर्दी करून खरेदी करणारे असोत, अशांचा निष्काळजीपणा त्यांच्यासह इतरांच्या जिवावर बेतू शकतो; पण त्याचे भान आहे कुठे ? जेव्हा सूचनांचे उल्लंघन करणार्यांची संख्या अधिक असते, तेव्हा सूचनांचे पालन करणारा वेडा ठरल्यासारखा दिसतो. आधीच स्वयंशिस्तीचा अभाव त्यात शिक्षा होण्याचा ‘उल्हास’, यांमुळे ‘नियम हे पाळण्यासाठी नाही, तर मोडण्यासाठी असतात’, अशी मानसिकता निर्माण होते.
कोरोनाच्या जागतिक साथीचा प्रतिकार करायचा असेल, तर समाजघटकांनी सरकारच्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे; पण ते होत नसेल, तर नियमभंग करणार्यांना तात्काळ शिक्षा देणे, हाच एक प्रभावी पर्याय ठरू शकतो. सध्या भारतात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमभंग करणार्यांवर गुन्हे नोंदवले जातही आहेत. पण पुढे काय ? कोरोनामुळे सध्या न्यायालयांच्या वेळाही अत्यल्प करण्यात आल्या आहेत. अशा वेळी खटले न्यायालयात सुनावणीसाठी येणार कधी ? ते सिद्ध होणार कधी ? दोषींना शिक्षा मिळणार कधी आणि गुन्हा करू धजावणार्यांना धाक बसणार कधी ? देशव्यापी संकटाने सर्वत्र हात-पाय पसरले असतांना दोषींना लवकर शिक्षा होणे आवश्यक आहे. नियमभंग करणार्यांना त्वरित आणि सार्वजनिकरित्या काही शिक्षा देणे, यावर मंथन व्हायला हवे. आज नियमभंग करण्याची वृत्ते प्रतिदिन आदळत आहेत; पण गुन्हे नोंदवले जाण्याव्यतिरिक्त काही कारवाई झाल्याच्या घटना ऐकिवात येत नाहीत. विदेशांमध्ये कोरोनाला अटकाव करण्यासाठी अतीकठोर उपाय अवलंबले जात आहेत. फिलिपाईन्सच्या राष्ट्रपतींनी दळणवळण बंदीचा आदेश मोडणार्यांना अथवा त्यामध्ये अडथळे निर्माण करणार्यांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचा आदेश दिला आहे. इटली आणि फ्रान्स या देशांमध्ये दळणवळण बंदी मोडणार्यांना मोठा आर्थिक दंड करण्यासह ३ किंवा ६ मास कारावासाचे प्रावधान आहे. भारतानेही अशा प्रकारे शिक्षेचा धाक दाखवायला हवा. केवळ जनजागृती पुरेशी नसते, तर नियम मोडण्याच्या उंबरठ्यावर असणार्यांना नियमभंगापासून परावृत्त करण्यासाठी शिक्षेचा धाकही हवा. शिक्षेच्या धाकाची मात्रा बहुतांश जणांना लागू पडू शकते; पण ज्यांच्यामध्ये विकृती ठासून भरलेली आहे, त्यांना तात्काळ आणि कठोर दंडच आवश्यक असतो.
तुघलकी तबलीगी !
तबलीगी जमातीच्या मुसलमानांनी भारतभर कोरोना पसरवण्यामध्ये वाटा उचलला. आता जेव्हा त्यांच्या कोरोनाच्या चाचण्या करण्यासाठी त्यांच्यावर वैद्यकीय उपचार केले जात आहेत, तेव्हा आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांना धमकावणे, वैद्यकीय पडताळणी करू न देणे, असे उद्योग त्यांनी चालू केले आहेत. अनेक धर्मांधांनी कोरोनाच्या उपचारांविषयी चुकीचे संदेश पसरवून पोलीस, प्रशासन आणि आरोग्य विभाग यांना न जुमानण्याचे आवाहन केले आहे. बिहारमध्ये धर्मांधांनी पोलिसांवर थेट गोळीबार केला. हरिद्वार येथे धर्मांध रुग्णालयातून पळून गेल्याच्या घटना घडल्या. उत्तरप्रदेशातील गाझियाबाद येथील रुग्णालयात धर्मांधांनी परिचारिका आल्यावर कपडे उतरवून अश्लील हावभाव केले. देहली येथे काही जणांनी रुग्णालय प्रशासनाकडे सिगारेटची मागणी केली. काही कोरोनाग्रस्त धर्मांध डॉक्टरांवर थुंकत आहेत. धर्मांध तबलीगींची ही नीच मानसिकता आहे. विकृती आहे. सरकारने तबलीगी प्रकरणात ९६० विदेशी धर्मांधांची नावे काळ्या सूचीत टाकून त्यांचा ‘व्हिसा’ रहित केला आहे; पण एवढेच पुरेसे नाही. जाणीवपूर्वक कोरोना पसरवणार्यांना आणि भारतीय व्यवस्थेशी असहकार करणार्यांना सरकारने तात्काळ कठोर शासन केले पाहिजे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘अमेरिकेमध्ये जाणीवपूर्वक कोरोनाचा संसर्ग पसरवणार्यांना ‘आतंकवादी’ ठरवणार’, असे घोषित केले आहे. ‘प्रशासनाची अडवणूक करणार्या भारतातील कोरोनाग्रस्त तबलीगी जमातची कृती आतंकवाद्यापेक्षा वेगळी नाही’, असे कुणी म्हटल्यास त्यात चूक काय ? केवळ त्याचे स्वरूप वेगळे आहे. ‘वैद्यकीय उपचारांमुळे स्वतःच्याच आरोग्याला लाभ होणार आहे’, एवढे सामान्य ज्ञानही नसणारे धर्मांध ‘एक तर त्यांच्या बुरसटलेल्या विचारांवर शिक्कामोर्तब करत आहेत किंवा कोरोना जिहाद करत आहेत’, असे कुणालाही वाटल्यास नवल काय ?
कठोर पावले उचला !
‘संकटकाळामध्ये मनुष्याचा खरा स्वभाव समोर येतो’, असे म्हणतात. गुन्हेगारीत बहुसंख्य असणार्या अल्पसंख्य समाजाच्या या वागण्यावरून हेच दिसून येते. या विकृतीपुढे प्रबोधन, जनजागृती असे मार्ग फिके पडतात. ज्यांना जगायची इच्छा नाही अथवा जगायचे कशासाठी ते ठाऊक नाही, त्यांचे जगणे म्हणजे एकप्रकारे भुईला भारच असतो. भुईला भार देणार्या तुघलकी वृत्तीच्या तबलीगींना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलणे, हाच उपाय आहे.