कोलंबो (श्रीलंका) : श्रीलंकेमध्ये कोरोनामुळे मरणार्या मुसलमानांच्या मृतदेहांचे दफन करण्याऐवजी त्यांच्यावर अग्नीसंस्कार केले जात आहेत. त्यांनी श्रीलंकेच्या प्रशासनावर इस्लामच्या धार्मिक संस्कारांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.
१. कोरोनामुळे मरणार्या व्यक्तींवरील अंत्यसंस्काराविषयी श्रीलंकेच्या आरोग्य विभागाने एक मार्गदर्शिका प्रसारित केली आहे. यात म्हटले आहे, ‘कोरोनामुळे मरणार्यांच्या मृतदेहांवर अग्नीसंस्कार करणे आवश्यक आहे. अग्नीसंस्कारापूर्वी मृतदेहाला अंघोळ घालणे आणि पेटीमध्ये ठेवणे यांवरही बंदी घालण्यात आली आहे.’
२. सरकारच्या या आदेशाला मुसलमान विरोध करत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमांनुसार कोरोनामुळे मरणार्यांचे मृतदेह दफन करू शकता किंवा अग्नीसंस्कार करू शकता.
३. कोलंबोमध्ये ७३ वर्षांच्या बिशरुफ हाफी महंमद यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांच्या मृतदेहावर अग्नीसंस्कार करण्यात आले. यास त्यांच्या मुलाने विरोध केला.
४. श्रीलंकेमध्ये आतापर्यंत १५९ जणांना कोरोनाची लागण झाली असून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. या ५ पैकी २ जण मुसलमान आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात