लंडन (ब्रिटन) : कोरोनाची लागण झालेले ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन गेल्या आठवड्याभरापासून स्वतःच विलगीकरणात रहात होते. तेथे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना रुग्णालयात हालवण्यात आले आहे; मात्र तेथे उपचार चालू असतांनाच जॉन्सन यांची प्रकृती आणखी खालावली. त्यामुळे त्यांना अतीदक्षता विभागात हालवण्यात आले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात