गरजवंताला अक्कल नसते, असे म्हणतात; मात्र गरजवंत महासत्ता असेल, तर ती दादागिरीचीच भाषा करणार ! भारताने अमेरिकेच्या या दादागिरीला भीक न घालता जे शक्य आहे, ते करावे, असेच जनतेला वाटते !
वॉशिंग्टन (अमेरिका) : मी रविवारी (५ एप्रिल) सकाळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. जर तुम्ही आम्हाला हायड्रोक्सीक्लारोक्वीन औषधाचा पुरवठा केला, तर आम्ही तुमचे आभारी असू, असे सांगितले आहे; पण जर त्यांनी पुरवठा केला नाही, तरी काही अडचण नाही; मात्र मग आम्हीही जशास तसे उत्तर देऊ, आणि ते आम्ही का करू नये ?, अशी धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली.
भारतात मलेरिया या रोगाशी लढण्यासाठी हायड्रोक्सीक्लारोक्वीन हे औषध प्रभावी ठरले होते. भारतातील औषध आस्थापने मोठ्या प्रमाणात या औषधाचे उत्पादन करत असतात. हेच औषध सध्या कोरोनावर मात करण्यासाठी काही प्रमाणात प्रभावी ठरत असल्यामुळे त्याच्या मागणीत वाढ झाली आहे. अमेरिकाही कोरोनावर उपचार करण्यासाठी याचा वापर करण्यावर भर देत आहे. यामुळेच डोनाल्ड ट्रम्प भारताकडे हे औषध देण्याची विनंती करत आहे; मात्र दळणवळण बंदीमुळे कच्च्या मालाचा अभाव निर्माण झाल्याने भारतातही या औषधाचे उत्पादन अल्प झाले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात