-
राष्ट्रीय ट्रेंडमध्ये चतुर्थ स्थानी
-
राष्ट्रप्रेमींकडून तबलीगी जमातवर बंदी घालण्याची मागणी
नवी देहली : देहलीतील तबलीगी जमातच्या कार्यक्रमानंतर देशभरात पसरलेल्या त्याच्या कोरोनाबाधित सदस्यांमुळे मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. इतकेच नव्हे, तर या सदस्यांना विविध रुग्णालयात ठेवल्यावर त्यांच्याकडून परिचारिकांशी अश्लील वर्तन करणे, डॉक्टरांवर थुंकणे आदी असभ्य वर्तन केले जात असल्याचे समोर येत आहे. तसेच तबलीगी जमातचे आतंकवादी संघटनांशी संबंध असल्याचेही समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर ६ एप्रिल या दिवशी ट्विटरवर ‘#BanTablighiJamaat’ हा ‘हॅशटॅग’ (ट्विटरवर चर्चित विषय) ‘ट्रेंड’ (एकाच वेळी अनेक जण एका विषयाची चर्चा घडवून आणतात, त्याला ‘ट्रेंड’ म्हणतात.) झालेला दिसून आला. हा हॅशटॅग राष्ट्रीय ट्रेंडमध्ये चतुर्थ स्थानी होता. यामध्ये जमातकडून देशात कशा प्रकारे उपद्रव करून देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होत आहे, याविषयी राष्ट्रप्रेमींनी ट्वीट्स केल्या. तसेच अशा संघटनांवर सरकारने त्वरित बंदी आणली पाहिजे, अशी मागणीही अनेकांकडून केली गेली. या ट्रेंडमध्ये २४ सहस्रांहून अधिक ट्वीट्स करण्यात आल्या.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात