Menu Close

भिवंडी (जिल्हा ठाणे) येथे धर्मांधांकडून पुजारी आणि हिंदू यांच्यावर आक्रमण

  • हिंदूंमध्ये तणाव

  • पोलिसांची प्रथम तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ

देश संकटकाळातून जात असतांना हिंदूंवर आक्रमण करणार्‍या हिंदुद्वेषी धर्मांधांची मानसिकता जाणा ! धर्मांधांच्या आक्रमणांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी हिंदूंना स्वरक्षण प्रशिक्षण घेण्याला पर्याय नाही !

हिंदूंची तक्रार घेण्यासही टाळाटाळ करणारे पोलीस भारताचे कि पाकचे ?

भिवंडी : येथील न्यू आझादनगर भागात रहाणार्‍या धर्मांधांनी सोरटी सोमनाथ मंदिराचे पुजारी आणि मंदिराच्या परिसरात रहाणारे हिंदू यांच्यावर ६ एप्रिलला सकाळी ७ च्या सुमारास काठ्या, बांबू आणि लोखंडी सळ्या घेऊन आक्रमण केले. यामध्ये ८ ते १० हिंदू घायाळ झाले आहेत. या प्रकरणी येथील शांतीनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकार्‍यांना विचारले असता त्यांनी ‘आम्ही आरोपींना कह्यात घेतले असून त्यांचावर पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत’, असे सांगितले. झालेल्या प्रकारामुळे येथील हिंदू प्रचंड तणावाखाली असून भयभीत झाले आहेत. ‘येथून निघून जावे’, असाही विचार काही जण करत आहेत. कोणताही अनुचित प्रकार पुन्हा घडू नये म्हणून या परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

१. पंतप्रधानांनी ५ एप्रिलला रात्री घरातील दिवे बंद करून तेलाचे दिवे किंवा भ्रमणभाषचे ‘फ्लॅशलाईट’ लावण्याचे आवाहन केले होते. त्याच वेळी रात्री ‘ये मोदीके समर्थक हे, इन्हे देख लेंगे’, असे मोठ्याने बोलत धर्मांध अंधाराचा लाभ घेत निघून गेले होते, असे येथील नागरिकांनी सांगितले.

२. यानंतर याच परिसरात ६ एप्रिल या दिवशी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास येथील पुजार्‍यांच्या घरात लुकमान नावाची व्यक्ती शिरली. तो भ्रमणभाष चोरत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर आरडाओरड केल्यावर शेजारील नागरिक बाहेर आले. यानंतर येथील मौलानाही आले आणि त्यांनी हिंदूंची समजूत काढली. त्यानंतर हिंदूंनी त्याला सोडून दिले. (चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई होण्यासाठी मौलानांनी स्वतःहून पोलिसांत तक्रार का केली नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

३. ६ एप्रिल या दिवशी सकाळी ७ वाजता लुकमान त्याच्यासमवेत १५ धर्मांधांना आरडाओरड करत घेऊन आला. त्यांच्याकडे काठ्या, बांबू आणि लोखंडी सळ्या होत्या. त्यांनी हिंदूंच्या घरात जाऊन त्यांना बाहेर काढले आणि त्यांच्यावर आक्रमण केले. (म्हणजे भ्रमणभाष चोरणे निमित्त होते. धर्मांधांना दंगलच करायची होती, हेच यावरून लक्षात येते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) यामध्ये ८ ते १० हिंदू घायाळ झाले असून त्यांपैकी ३-४ जणांच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली आहे, तर उर्वरित नागरिकांना मुका मार लागला आहे. दुखापत झालेल्यांवर येथील रुग्णालयात उपचार करून सोडून देण्यात आले आहे.

या प्रकरणी शांतीनगर पोलिसांनी लुकमान, अनिस बाबू आणि आदिल यांच्या विरोधात भारतीय दंडसंहिता १८६० चे ३२४, ५०४ आणि ३४ अन्वये गुन्हा नोंद केला असून पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

तक्रार नोंद करून घेण्यास पोलिसांची टाळाटाळ !

धर्मांधांच्या विरोधात तक्रार नोंदवून घेण्यास पोलीस त्यांना घाबरतात कि पोलिसांचे त्यांच्याशी लागेबांधे आहेत ? भिवंडीत पोलिसांसमवेत धर्मांधांनी केलेले कुकृत्य पोलीस विसरतात का ?

हा प्रकार घडल्यावर महिला आणि येथील हिंदू तक्रार नोंदवण्यास गेले असता  पोलिसांनी हिंदूंनाच समजावण्याचा प्रयत्न केला आणि तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली. पोलीस म्हणाले, ‘‘राज्यात काय स्थिती आहे आणि तुम्ही असे काय करत आहात ?’’ (हे आक्रमणकर्त्या धर्मांधांना पोलीस का सांगत नाहीत ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) यानंतर भिवंडीतील हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन येथील भाजपचे आमदार महेश चौगुले यांना हा प्रकार सांगितला. यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंद केल्याचे पीडित हिंदू आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी सांगितले.

अन्यथा आम्हाला विस्थापित होण्याची वेळ येईल ! – एक प्रत्यक्षदर्शी नागरिक

येथील धर्मांध लोक हिंदूंना धमकावणे, मारणे, शिवीगाळ करणे, असे प्रकार करत असतात. त्यामुळे येथील हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धर्मांधांच्या नेहमीच्याच त्रासाला आम्ही कंटाळलो असून त्यांच्यावर कठोर कारवाई करून हिंदूंना न्याय मिळवून द्यावा, अन्यथा आमच्यावर विस्थापित होण्याची वेळ येईल, अशी भीती आम्हाला वाटते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *